फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया
पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज : पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना मुलतानमध्ये सुरू आहे. या सामन्याचा आज तिसरा दिवस आहे, या सामन्यातील तीन डाव संपले असून तिसऱ्या दिवसाचा खेळ अद्याप सुरू आहे. पाकिस्तानच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये २३० ढवाय केल्या होत्या, तर वेस्ट इंडिजच्या संघाने पाहिलंत डावांमध्ये फक्त १३७ धावा केल्या आहेत. पण आता खेळाची दिशा बदलताना दिसत आहे. पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या १५७ धावांत गडगडला. अशा स्थितीत थोडंफार खरं असलं तरी वेस्ट इंडिजसाठी हा कसोटी सामना जिंकण्यासाठी दरवाजे खुले आहेत.
मनू भाकरवर कोसळला दु:खाचा डोंगर! भीषण अपघातात कुटुंबातील दोघांचा मृत्यू
फिरकीपटूंना अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर वेस्ट इंडिजसमोर २५१ धावांचे लक्ष्य आहे. हे साध्य करणे कठीण आहे, परंतु अशक्य नाही. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा फिरकीपटू जोमेल वॅरिकनने पाकिस्तान संघाचा धुव्वा उडवला. जोमेल वॅरिकनने ७ विकेट घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात कर्णधार शान मसूदने ५२ धावा केल्या, तर मुहम्मद हुरैराने २९ धावांची खेळी केली. कामरान गुलामच्या बॅटमधून २७ तर सलमान अली आगाने १४ धावा केल्या. याशिवाय सर्व फलंदाज फ्लॉप ठरले.
दुसऱ्या डावात पाकिस्तानचे दोन फलंदाज धावबाद झाले, तर वॅरिकनने सात आणि गुडाकेश मोतीने एक बळी घेतला. वॉरिकनने पहिल्या डावात ३ विकेट्सही घेतल्या. पहिल्या डावात मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी अर्धशतके झळकावलेल्या पाकिस्तानला सावरले. पाकिस्तानकडून गोलंदाजीत साजिद खानने ४ आणि नोमून अलीने ५ विकेट्स घेतल्या.
Pakistan on 🔝 at lunch on day three 🏏
Half of the West Indies side is back in the hut for 54 in pursuit of the 251-run target ☄️#PAKvWI | #RedBallRumble pic.twitter.com/faT4ZalL66
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 19, 2025
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तान संघाने पहिल्या डावात सर्व विकेट्स २३० धावांत गमावल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव १३७ धावांवर आटोपला. अशाप्रकारे पाकिस्तानला ९३ धावांची मौल्यवान आघाडी मिळाली, पण त्याचा फायदा पाकिस्तानी संघाला दुसऱ्या डावात घेता आला नाही. पाकिस्तानने दुसऱ्या डावात केवळ १५७ धावा केल्या आणि त्यामुळे एकूण २५० धावा झाल्या. वेस्ट इंडिजला विजयासाठी २५१ धावा करायच्या आहेत. वेस्ट इंडिजच्या संघाने २१ ओव्हरमध्ये ५ विकेट्स गमावून ८० धावा केल्या आहेत.
या सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये खराब कामगिरीकेली होती. परंतु त्यांनी आता दुसऱ्या इनिंगमध्ये कमबॅक केला आहे त्यामुळे त्यांना सामना जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. सामन्याचा निर्णय कोणाच्या दिशेने जाणार हे पाहणं मनोरंजक ठरेल.