फोटो सौजन्य – X (ICC)
पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तीन सामन्याची T20 मालिका पार पडली. या मालिकेमध्ये दोन सामन्यानंतर 1-1 अशी बरोबरी केली. आज या मालिकेचा तीसरा सामना पार पडला. तिसऱ्या आणि शेवटच्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजचा १३ धावांनी पराभव केला. या सामन्याचे वेस्ट इंडिजच्या लॉडरहिल सेंट्रल ब्रोवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंडवर करण्यात आले होते. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार आगा सलमानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने निर्धारित २० षटकांत ४ गडी गमावून १८९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल विंडीज संघाला फक्त धावाच करता आल्या. अशाप्रकारे, पाकिस्तानने ही तीन सामन्यांची टी२० मालिका २-१ अशी जिंकली. पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज तिसऱ्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली.
सलामीवीर साहिबजादा फरहान आणि सैम अयुब यांनी आक्रमक सुरुवात केली. दोन्ही सलामीवीरांमध्ये पहिल्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी झाली. दोघांनीही उत्तम सुरुवात केली आणि मोठी धावसंख्या उभारण्याचा पाया रचला. फरहान सुरुवातीपासूनच आक्रमक दिसत होता तर अयुबने वेळ काढून पॉवरप्लेमध्ये संयमाने खेळला. तथापि, भागीदारी तुटल्यानंतर, इतर फलंदाजांनी फारसे योगदान दिले नाही आणि धावसंख्या १८९ पर्यंत पोहोचली.
प्रत्युत्तरादाखल, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाची सुरुवात खराब झाली. यष्टीरक्षक ज्वेल अँड्र्यू १५ चेंडूंचा सामना करताना २४ धावा काढून बाद झाला. अलिकने ४० चेंडूत ६० धावा केल्या, ज्यामध्ये ८ चौकार आणि १ षटकार होता. कर्णधार शाई होप अवघ्या ७ धावा काढून बाद झाला. शेरफेन रुदरफोर्डने धावा काढल्या आणि संघाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. रोस्टन चेस रिटायर्ड हर्टने परतला.
IND vs ENG : मोहम्मद सिराजची ती चुक टीम इंडीयाला पडणार महागात? भारताच्या संघ मालिका गमावणार…
वेस्ट इंडिजला शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी २५ धावांची आवश्यकता होती आणि त्यांच्याकडे ५ विकेट शिल्लक होत्या. शेरफेन रदरफोर्ड ५१ धावा करून क्रीजवर खेळत होती. तो सामना वेस्ट इंडिजच्या बाजूने वळवू शकेल अशी अपेक्षा होती, पण शेवटच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हसन अलीने त्याला आपला बळी बनवले. साहिबजादा फरहानने त्याचा झेल घेतला. गुडकेशने या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि पाचव्या चेंडूवर षटकार मारून सर्वोत्तम प्रयत्न केला, पण शेवटी पाकिस्तानच्या संघाने १३ धावांनी सामना जिंकला.
अशाप्रकारे, पाकिस्तानने वेस्ट इंडिजच्या भूमीवर टी-२० मधील आपला जुना कलंक पुसून टाकला आहे. यापूर्वी खेळल्या गेलेल्या मालिकेत, बांगलादेशने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत पाकिस्तानचा २-१ असा पराभव केला.