फोटो सौजन्य - BCCI
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या फायनल नंतर नव्या सायकलला सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने डब्ल्यूटीसी फायनल जिंकल्यानंतर आता सर्व संघ हे त्यांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल च्या गुणतालिकेवर लक्ष केंद्रित करत आहेत. चॅम्पियन ट्रॉफी आधी भारताच्या संघाने दोन कसोटी मालिका गमावल्या होत्या. त्यानंतर इंग्लंड दौऱ्याआधी भारताचे दोन मुख्य खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही कसोटी क्रिकेटला अलविदा केला. त्यानंतर टीम इंडियाचा नवा कर्णधार म्हणून शुभमन गिल याची निवड करण्यात आली.
शुभमन गिल याची कर्णधार म्हणून निवड केल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्याच्या कामगिरीवर त्याचबरोबर त्याच्या कॅप्टनसीवर प्रश्न उचलण्यात आले होते. आज या मालिकेचा शेवटचा दिवस खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यात ही मालिका ड्रॉ होणार की इंग्लंडचा संघ ही मालिका जिंकणार याचा निर्णय होईल. इंग्लंडच्या संघाला या मालिकेमध्ये जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे तर भारताच्या संघाला या मालिकेमध्ये ड्रॉ करण्यासाठी तीन विकेटची गरज आहे. भारताच्या युवा संघाने इंग्लंडचे आव्हान स्वीकारत या मालिकेमध्ये कमालीची कामगिरी केली या मालिकेचा एकही सामना हा पाच दिवसांच्या आधी संपलेला नाही.
IND vs ENG : मोहम्मद सिराजची ती चुक टीम इंडीयाला पडणार महागात? भारताच्या संघ मालिका गमावणार…
पहिला सामन्यांमध्ये भारताच्या संघाला पाच विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी भारताच्या संघाने फलंदाजी कमलीची केली होती फक्त गोलंदाजी मध्ये टीम इंडियाला संघर्ष करावा लागला होता. दुसऱ्या सामन बद्दल सांगायचे झाले तर एजबेस्टन येथे झालेल्या या सामन्यात भारताचे संघाने हा सामना 336 धावांनी जिंकला आणि मालिकेमध्ये बरोबरी केली होती.
लॉर्ड्स येथे झालेला कसोटी सामना हा ऐतिहासिक सामना झाला. भारताच्या संघाला या सामन्यांमध्ये 22 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या सामन्यामध्ये भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा हा शेवटपर्यंत लढत राहिला आणि नाबाद खेळी खेळली. टीम इंडियाला या सामन्यांमध्ये जिंकून मालिकेमध्ये आघाडी घेण्याची संधी होती पण मोहम्मद सिराजचा शेवटचा विकेट गमावल्यानंतर भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
– 1st Test goes day 5.
– 2nd Test goes day 5.
– 3rd Test goes day 5.
– 4th Test goes day 5.
– Now 5th Test goes day 5.THIS TEST SERIES BETWEEN INDIA & ENGLAND IS ONE OF THE MOST ICONIC SERIES EVER. 🫡 pic.twitter.com/2NL8m12sEP
— Tanuj (@ImTanujSingh) August 4, 2025
मॅचेस्टर येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताच्या संघाने सामना ड्रॉ केला. या मालिकेमधील हा सामना देखील फारच कमालीचा होता कारण भारताचा संघ पहिल्या डावामध्ये माघारी असताना त्याचबरोबर इंग्लंडच्या पहिल्या दिवशी 669 धावा गेल्यानंतर टीम इंडिया हा सामना गमावणार अशा चर्चा सुरू होत्या. या सामन्यांमध्ये रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या खेळीने भारताच्या संघाला ड्रॉपर्यंत नेली आणि सामना अनिर्णित राहिला.
ओव्हल येथे सुरू असलेल्या सामन्यांमध्ये भारताचे संघाला चार विकेटची गरज आहेत तर इंग्लंडच्या संघाला फक्त 35 धावांची गरज आहे. 14 दिनाच्या समाप्तीनंतर इंग्लंडच्या संघाने आतापर्यंत सहा विकेट गमावले आहेत तर 339 धावा केल्या आहे. टीम इंडियाला जर या सामन्यात विजय मिळवायचा असल्यास जेमी स्मित याचा विकेट लवकर घेणे गरजेचे आहे.