Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK vs SL: फखर जमानचा मैदानात धुमाकूळ! श्रीलंकेचा सुपडा साफ करत पाकिस्तानने जिंकली ट्राय सीरिज; भारताच्या विक्रमाशी बरोबरी

Pakistan Won Tri Series Final Beat Sri Lanka Final: ट्राय सीरीजच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा दारुण पराभव करुन ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या विजयात फखर जमानने महत्वाची भूमिका बजावली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 01, 2026 | 01:42 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानने रचला इतिहास
  • श्रीलंकेला हरवत ट्राय सीरिजच्या ट्रॉफीवर कोरले नाव
  • भारतानंतर आता पाकिस्तानचाही पराक्रम
Pakistan Beat Sri Lanka: पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात एक ट्राय सीरीज खेळली गेली. पाकिस्तानमध्ये खेळलेल्या या मालिकेत पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी अंतिम सामन्यात आपली जागा पक्की केली. मात्र, निराशाजनक कामगिरीमुळे इंग्लंड संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरू शकला नाही. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात ३१ ऑक्टोबर रोजी ट्राय सीरीजचा अंतिम सामना खेळला गेला. हा सामना लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर पार पडला या सामन्यात पाकिस्तानने उत्कृष्ट कामगिरी केली आणि विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करून ट्रॉफी जिंकली. अंतिम सामन्यातील विजयामुळे पाकिस्तानने टीम इंडियाच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरीही केली आहे.

IND vs NZ: हॅमिल्टनमध्ये धावांचा महापूर की गोलंदाज उडवणार दांड्या? सेडन पार्कवर कोणाचा दबदबा; पाहा Pitch Report

अंतिम सामन्यात पाकिस्तानने केला श्रीलंकेचा पराभव

ट्राय सीरीजच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली. कामिंदू मेंडिसने शानदार फलंदाजी करत १२८ चेंडूंमध्ये १३१ धावा केल्या. पवन रत्नायकेनेही ७७ धावा केल्या तर अविष्का फर्नांडोने ३८ धावा केल्या. यामुळे श्रीलंकेला ५० षटकांत ८ विकेट्स गमावून ३२५ धावांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. पाकिस्तानकडून कर्णधार शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि सलमान अली आगा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतले.

पाकिस्तानला विजयासाठी ३२६ धावांची गरज होती. पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक होती. त्यांनी अवघ्या १४ धावांत दोन विकेट्स गमावले. फखर जमान आणि साद बेग यांनी एक शानदार भागीदारी केली. साद बेगने ७५ चेंडूंमध्ये ७४ धावा केल्या, तर फखर जमानने ९९ चेंडूंमध्ये १२६ धावांची शानदार खेळी केली.

खालच्या फळीत फलंदाजी करणाऱ्या अराफत मिन्हासने ३१ चेंडूंमध्ये धडाकेबाज ६१ धावा केल्या, तर हसन नवाझने ३७ धावा केल्या. यामुळे पाकिस्ताने ४८.३ षटकांत ३२६ धावांचा यशस्वीपणे पाठलाग केला. पाकिस्तानने श्रीलंकेवर ३ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह, पाकिस्तानने २०२६ च्या ट्राय सीरीजचा अंतिम सामना जिंकून ट्रॉफी जिंकली.

पाकिस्तानने केली टीम इंडियाच्या विक्रमाची बरोबरी

१३ जुलै २००२ रोजी भारताने नॅटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत केले. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील हा एक अत्यंत ऐतिहासिक विजय आहे. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, भारतीय संघाने ३२६ धावांचे लक्ष्य गाठताना इंग्लंडला हरवले. या सामन्यात युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांनी एक अविस्मरणीय भागीदारी केली.

पुरुषांच्या एकदिवसीय अंतिम सामन्यातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धावांचा पाठलाग होता. श्रीलंकेविरुद्ध ३२६ धावांचे लक्ष्य पूर्ण करून पाकिस्तानने भारताच्या विक्रमाची बरोबरी केली. पुरुषांच्या एकदिवसीय अंतिम सामन्यातील सर्वात मोठ्या धावांच्या पाठलागाचा संयुक्त विक्रम आता पाकिस्तान आणि भारताच्या नावावर आहे.

WTC Points Table मध्ये टीम इंडियाची बल्ले-बल्ले! वेस्ट इंडिजने बांग्लादेशला दिला धक्का, भारताचा थेट ‘या’ क्रमांकावर कब्जा

Web Title: Pakistan beat sri lanka tri series final record run chase pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • PAK vs ENG
  • PAK vs SL
  • Pakistan Cricket Board

संबंधित बातम्या

ICC चा Haris rauf ला मोठा दणका! विल जॅक्सशी भिडणं पडलं महागात; मैदानात नेमकं काय घडलं?
1

ICC चा Haris rauf ला मोठा दणका! विल जॅक्सशी भिडणं पडलं महागात; मैदानात नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.