Champion Trophy 2025: Despite being in the group stage of the Champions Trophy, Aaqib Javed gets an extension; Pakistan does not have a new coach.
Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. साखळी फेरीतच पाकिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर झाला आहे. विशेष म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्ताकडे आहे. पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर संघातील खेळाडूंवर टीका होत आहे. असे असताना देखील पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रशिक्षक आकिब जावेद यांना या पदावर कायम ठेवले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून माजी वेगवान गोलंदाज आणि राष्ट्रीय निवडकर्ता आकिब जावेद यांना न्यूझीलंड दौऱ्यापर्यंत अंतरिम मुख्य प्रशिक्षकपदी राहण्यास सांगण्यात आले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि न्यूझीलंड दौऱ्यातील कमी कालावधीमुळे आकिब मुख्य प्रशिक्षकपदी असणार आहेत. पीसीबीकडून या दरम्यान नवीन मुख्य प्रशिक्षक शोधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मागील वर्षी, पीसीबीने जेसन गिलेस्पी यांची कसोटी प्रशिक्षक तर गॅरी कर्स्टन यांची मर्यादित षटकांच्या फॉरमॅटचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, या दोघांनीही बोर्डातील समस्यांमुळे सहा ते आठ महिन्यांतच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
हेही वाचा : IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 265 धावांचे आव्हान; स्टीव्ह स्मिथ चमकला, मोहम्मद शमीचा प्रभावी मारा…
आकिबला जावेदला पांढऱ्या चेंडूच्या संघाचे अंतरिम मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते. तसेच दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेतही कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. आकिब तिरंगी मालिकेत आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही संघाचा प्रशिक्षक होता. ज्यामध्ये यजमान एकही विजय न मिळवता बाहेर पडले होते. तसेच पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद युसूफ हा फलंदाजी प्रशिक्षक असणार आहे.
प्रसिद्धीपत्रकानुसार, मोहम्मद रिझवान वनडेचा कर्णधार राहणार आहे. तर सलमान आगाला वनडेमध्ये उपकर्णधाराची जबाबदारी देण्यात आली आहे. पाकिस्तान 50 षटकांच्या क्रिकेट विश्वचषक 2027 च्या दिशेने वाटचाल करत आहे. तर मोहम्मद रिझवान एकदिवसीय संघाचे नेतृत्व करत राहणार आहे.
सलमानला कर्णधार बनवण्यात आले आहे. टो म्हणाला की, आगामी आशिया कप आणि टी-20 विश्वचषक स्पर्धा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आशिया कप सप्टेंबर 2025 मध्ये खेळवला जाणार आहे. तर टी-20 विश्वचषक फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्ये खेळवला जाईल. सलमानने गेल्या वर्षी झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत पाकिस्तानचे नेतृत्व केले होते. ती मालिका पाकिस्तानने २-१ ने जिंकली होती. मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांना टी-20 संघातून वगळण्यात आले असून तीन अनकॅप्ड खेळाडूंचा संघात समावेश केला आहे.