Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पराभूत संघ होणार मालामाल(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
Champion Trophy 2025 : दुबईत आज चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमी फायनलचा थरार सुरू आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया समोरासमोर उभे आहेत. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जणिकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या 231 धावा झाल्या असून त्यांनी 6 विकेट्स गमावल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद पाकिस्तानकडे असून भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात खेळलायला नकार दिला आहे. त्यामुळे भाराताचे सर्व सामने दुबईत खेळवले जात आहे. पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. तर 5 मार्चला दक्षिण आफ्रिकेचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीतून बाहेर पडणाऱ्यांना संघाला आयसीसीकडून किती पैसे मिळणार आहेत? माहिती आहे का? चला जाणून घेऊया.
आयसीसीकडून (ICC) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी एकूण $6.9 दशलक्ष बक्षीस रक्कम ठरवण्यात आली आहे. या स्पर्धेचे विजेतपद मिळवणाऱ्या संघाला $2.24 दशलक्ष (अंदाजे 19.5 कोटी रुपये) आणि उपविजेत्या संघाला $1.12 दशलक्ष (अंदाजे 9.78 कोटी रुपये) मिळणार आहेत. तर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमी फायनल फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला 560,000 डॉलर म्हणजेच अंदाजे 4.89 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
आयसीसीने तब्बल 8 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले आहे. 2017 मध्ये शेवटचे आयोजन करण्यात आले होते. 2017 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव करत ही स्पर्धा आपल्या नावे केले होते. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद असणाऱ्या पाकिस्तानला साखळी फेरीतच स्पर्धेतून गाशा गुंडाळवा लागला आहे. ‘अ’ गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, आणि बांगलादेश यांचा समावेश असून ‘ब’ गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश होता. अ गटातून भारत आणि न्यूझीलंड, तर ब गटातून दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली , श्रेयस अय्यर , अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी आणि वरुण चक्रवर्ती
ट्रॅव्हिस हेड, कूपर क्रोनाली, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिश (विकेटकिपर), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशियस, नॅथन एलिस, अॅडम झांपा, तनवीर संघा