
england vs pakistan
इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सलग दोन सामने गमावल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये मोठा भूकंप झाला होता. मालिकेच्या मधेच एकाच झटक्यात तब्बल ७ खेळाडूंना संघातून मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले, तर संघाच्या मुख्य प्रशिक्षकांचीही हकालपट्टी करण्यात आली. मात्र, एवढे मोठे फेरबदल करूनही मैदानावरील पाकिस्तानच्या कामगिरीत बदल झाल्याचे दिसून आलेले नाही.
Pak Vs Eng: आता नसलेली लाज राखण्याची संधी; Babar Azam अन् संघ इंग्लंडविरुद्ध सज्ज
टॉस जिंकून इंग्लंडच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडच्या संघाने घेतलेला हा निर्णय एकदम योग्य ठरला. पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली. पाकिस्तानच्या संघात 4 महत्वाचे बदल केले गेले होते. क्रिकेट बोर्डाने केलेल्या अनेक बदलांमुळे पाकिस्तान आज चांगली फलंदाजी करेल असे वाटत होते. मात्र त्यांना यश आले नाही.
Josh Tongue on target 🎯 Follow every ball live 👉 https://t.co/VUdUehsgT2 pic.twitter.com/uzGWAoT65y — England Cricket (@englandcricket) September 9, 2026
पाकिस्तानची फलंदाजीची वाईट अवस्था झाल्याचे दिसून आले. पाचव्या स्थानावर कर्णधार बाबर आझम खेळण्यासाठी मैदानात उतरला. आज बाबर आझम चांगली खेळी करेल अशी अपेक्षित होते. मात्र तो देखील अपयशी ठरला. 18 बॉलमध्ये केवळ 7 रन्स करून तो आउट झाला. तो केवळ एक फोर मारू शकला. जोश टंगच्या बॉलवर बाबर आझम क्लीन बोल्ड झाला. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. यामध्ये दिसून येत आहे की बाबर आझमला बॉल कधी आला आणि स्टंपवर आदळला. या सामन्यात पाकिस्तानचा संघ पहिल्याच दिवशी बॅकफूटवर गेल्याचे दिसून येत आहे.
ENG Vs PAK: आधी लफडं करायचं अन् मग भोगायचं! तिसऱ्या टेस्टआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डात महाभूकंप
दुसरीकडे इंग्लंडचा संघ अत्यंत मजबूत स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. इंग्लंडच्या संघाने संपूर्ण मालिकेत सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळ दाखवत मालिकेत आघाडी घेणारा इंग्लंडचा संघ तिसऱ्या सामन्यातही आपली हीच विजयी लय कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.