इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान (फोटो- सोशल मिडिया)
इंग्लंडविरुद्धच्या सलग दोन कसोटी सामन्यांतील लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डात मोठा स्फोट झाला आहे. तीन सामन्यांच्या सिरिजमध्ये अजून शेवटची कसोटी बाकी असतानाच पाकिस्तानने सिरिज गमावली आहे. या नामुष्कीनंतर पीसीबीने अत्यंत कठोर पाऊल उचलत अचानक तब्बल सात खेळाडूंना मायदेशी परत पाठवले असून कोचिंग स्टाफचीही हकालपट्टी केली आहे.
सिरिज गमावल्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंच्या वर्तनाची आणि शिस्तभंगाची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये आलेल्या गंभीर आरोपांनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे बोर्डाचे म्हणणे आहे. बोर्डाकडून अधिकृतपणे खेळाडूंच्या शिस्तभंगाचे कारण दिले जात असले, तरी पडद्यामागे हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे मानले जात आहे. खेळाडूंचे गैरवर्तन, आपापसातील मतभेद आणि इतर काही संशयास्पद हालचालींबाबत पीसीबीचे अधिकारी सध्या उघडपणे बोलणे टाळत असल्याचे समजते आहे.
PAK Vs ENG: लाज गेल्यावर आली अक्कल म्हणून लढवली शक्कल! PCB चा ‘धडक’ स्ट्राईक; पाकिस्तानात भूकंप
सिरिजमधील तिसरा आणि अंतिम सामना अद्याप बाकी असतानाच अर्ध्याहून अधिक खेळाडूंना आणि मुख्य प्रशिक्षकांसह सपोर्ट स्टाफला हटवण्यात आल्यामुळे पाकिस्तान संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ऐन मालिकेच्या मध्यमात झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे पाकिस्तान क्रिकेटमधील अंतर्गत कलह आणि अनागोंदी पुन्हा एकदा जगासमोर आली आहे.
ENG Vs PAK: आधीच सपशेल फ्लॉप अन् त्यात आला ताप! पाकड्यांना लागली नजर, ‘हा’ खेळाडू आजारी
लॉर्ड्स कसोटीदरम्यान इमाम-उल-हक दुखापतग्रस्त झाल्यामुळे मैदानातून बाहेर पडला होता. मात्र, तो खरोखरच दुखापतग्रस्त आहे की संघातून काढता पाय घेण्यासाठी त्याने दुखापतीचे बनावट नाटक रचले, असा गंभीर आरोप आता त्याच्यावर होत आहे. क्रीडा वर्तुळात आणि पाकिस्तानच्या माजी खेळाडूंकडून इमामच्या या वर्तनावर प्रचंड टीका होत आहे. आरोप सिद्ध झाल्यास इमाम-उल-हकवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विकेटकिपर अन् फलंदाज मोहम्मद रिझवान याला अचानक मायदेशी बोलावल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.






