फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया
पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश : आज यजमान संघाचा चॅम्पियन ट्रॉफीचा शेवटचा सामना असणार आहे. पाकिस्तानचा संघ आज बांग्लादेशविरुद्ध शेवटचा चॅम्पियन ट्रॉफीचा सामना खेळणार आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेश दोन्ही संघाची चॅम्पियन ट्रॉफीमध्ये कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. यामध्ये दोन्ही संघ सेमीफायनलच्या शर्यतीमधून बाहेर झाले आहेत. दोन्ही संघ झालेले दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत झाले आहेत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये आतापर्यंत दोन्ही सामने गमावल्यानंतर यजमान पाकिस्तान आणि बांगलादेश गट अ मध्ये एकमेकांसमोर येत आहेत. तो त्याचा शेवटचा सामना खेळेल.
आता दोन्ही संघ त्यांचा शेवटचा सामना जिंकून स्पर्धेला निरोप देऊ इच्छितात. हा सामना पाकिस्तानसाठी अधिक महत्त्वाचा असेल कारण त्यांना त्यांचा प्रवास डोके वर करून संपवायचा असेल आणि चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी द्यायची असेल. सलग दोन पराभवांनंतर त्याला जगभरातून टीकेचा सामना करावा लागत आहे. ग्रुप अ मधील पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामना गुरुवारी (२७ फेब्रुवारी) रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामना दुपारी २:३० वाजता सुरू होईल. सामान्यांच्या अर्ध्यातासाआधी म्हणजेच २ वाजता नाणेफेक होईल.
जर पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश हा सामना तुम्हाला लाईव्ह पाहायचा असेल तर तुम्ही हा सामना स्टार स्पोर्ट्स किंवा स्पोर्ट्स १८ च्या कोणत्याही चॅनेलवर तुम्हाला पाहता येणार आहे. याशिवाय, तुम्ही OTT द्वारे या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग Jio Star अॅप डाउनलोड करू पाहू शकता. मोहम्मद रिझवान पाकिस्तानचे नेतृत्व करणार आहे, तर बांगलादेशचे नेतृत्व नझमुल हुसेन शांतो करणार आहे. दोन्ही संघ आज कशाप्रकारे कामगिरी करणार हे पाहणं मनोरंजक ठरेल.
अफगाणिस्तानच्या शानदार विजयानंतर शोएब अख्तर आणि इरफान पठाणची प्रतिक्रिया, सोशल मीडिया Video Viral
पाकिस्तान आणि बांग्लादेश हे दोन्ही संघ सेमीफायनलच्या शर्यतीमधून बाहेर झाले आहेत, त्यामुळे ग्रुप अ मधून भारत आणि न्यूझीलंड हे संघ उपांत्य फेरीचे सामने खेळणार आहेत.
Which team ends their #ChampionsTrophy campaign with a win in Rawalpindi? 🤔
How to watch 👉 https://t.co/S0poKnxpTX pic.twitter.com/vo3KRXPcFB
— ICC (@ICC) February 27, 2025
मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सलमान आघा, इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, तैयब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद.
तन्जीद हसन, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मेहदी हसन मिराज, तौहीद हृदयॉय, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्लाह, जाकेर अली, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, नाहिद राणा, मुस्तफिजुर रहमान.