फोटो सौजन्य - सोशल मिडिया
बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ढाका येथे खेळला गेला. हा पाकिस्तानच्या संघाने 128 धावांनी बांग्लादेशविरूद्ध जिंकला आणि मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी केली आहे. या मालिकेचा आता शेवटचा निर्णायक सामना शिल्लक आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली यामुळे सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ही घटना घडली आहे. या सामन्यादरम्यान पाकिस्तानी अष्टपैलू हुसेन तलतचा अपघात झाला. या अपघातामध्ये तो गंभीर जखमी देखील झाला आहे.
क्षेत्ररक्षण करताना त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याला स्ट्रेचरवर मैदानाबाहेर न्यावे लागले. ही दुखापत इतकी गंभीर आहे की तो आता रुग्णालयात दाखल आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने यजमान बांगलादेशसमोर २७५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ ११४ धावांवरच बाद झाला. पाकिस्तानने हा सामना १२८ धावांनी जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
Pakistan all-rounder Hussain Talat sustained a shoulder injury while fielding during the second ODI against Bangladesh.
Talat received immediate medical attention then he has been taken to a hospital for a detailed examination. Get well soon Husain pic.twitter.com/SyKZnNNfwj — Sohail Imran (@sohailimrangeo) March 13, 2026
दुसऱ्या डावातील सहाव्या षटकात हुसेन तलत जखमी झाला. मोहम्मद वसीमच्या चेंडूवर लिटन दासने कव्हर पॉइंटकडे शॉट मारला, ज्यामुळे तलत सीमारेषेकडे धावला. हुसेन तलत सीमारेषेजवळ चेंडू थांबवण्याचा प्रयत्न करत असताना, त्याचा पाय फोम पॅडिंगवर पडला आणि तो एका जाहिरातीच्या बोर्डवर आदळला; तो त्याच्या डाव्या खांद्यावर जोरात पडला आणि वेदनेने ओरडला. त्याचे सहकारी आणि कर्मचारी ताबडतोब त्याच्या मदतीला धावले, त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णवाहिकेत नेण्यासाठी स्ट्रेचर आणण्यात आले.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सांगितले की, तलतवर संघाच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी ताबडतोब मैदानावर उपचार केले आणि नंतर अधिक तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. बोर्डाने असेही म्हटले आहे की, दुखापतीचे नेमके स्वरूप आणि तीव्रता सविस्तर वैद्यकीय तपासणीनंतरच निश्चित केली जाईल.
“मैदानावर असलेल्या संघाच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तलतला ताबडतोब वैद्यकीय मदत दिली. प्राथमिक तपासणीनंतर, त्याला सविस्तर तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी पुढील वैद्यकीय चाचण्या पूर्ण केल्यानंतरच दुखापतीचे स्वरूप आणि तीव्रता कळेल,” असे पीसीबीने एका मीडिया रिलीजमध्ये म्हटले आहे.






