Pakistan (Photo Credit- X)
Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ मध्ये झालेल्या सामन्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) मोठा गोंधळ घातला. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्यानंतर, पाकिस्तानने आयसीसीकडे मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना स्पर्धेतून हटवण्याची मागणी केली. मात्र, आयसीसीने ही मागणी फेटाळली. याच दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रमीझ राजाने मॅच रेफरीवर गंभीर आरोप करत त्यांना टीम इंडियाचा ‘फिक्सर’ म्हणून संबोधले होते. पण आता रमीझच्या या विधानाची सोशल मीडियावर पोलखोल झाली आहे.
रमीझ राजाने अँडी पायक्रॉफ्टवर आरोप करताना म्हटले होते की, त्यांनी आतापर्यंत भारताच्या ९० सामन्यांमध्ये मॅच रेफरी म्हणून काम केले आहे. रमीझच्या मते, पायक्रॉफ्ट यांनी भारताच्या सामन्यांमध्ये गरज असल्यापेक्षा जास्त वेळा रेफरीची भूमिका बजावली आहे, ज्यामुळे ते टीम इंडियाचे ‘फिक्सर’ आहेत. मात्र, रमीझ राजाचा हा दावा आता खोटा ठरला आहे.
Controversial match referee “Andy Pycroft is a favourite of India. He has been the referee 90 times in India’s matches” says Ramiz Raja pic.twitter.com/JdwGi54nJ5
— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) September 17, 2025
गार्गी रावत नावाच्या एका सोशल मीडिया युजरने रमीझ राजांच्या विधानाची पोलखोल केली. तिने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, अँडी पायक्रॉफ्ट यांनी आतापर्यंत एकूण ५३५ सामन्यांमध्ये रेफरीची भूमिका बजावली आहे. त्यात त्यांनी भारताच्या १२४ सामन्यांमध्ये, इंग्लंडच्या १०७ सामन्यांमध्ये आणि पाकिस्तानच्या १०२ सामन्यांमध्ये मॅच रेफरी म्हणून काम केले आहे.
Out of the 535 men’s matches Andy Pycroft has officiated, 124 were for India with almost identical numbers for others: 107 for England and 102 for Pakistan.
So what exactly are you trying to prove? Atleast get the numbers right. https://t.co/X93IZCCJ3g
— Gargi Raut (@gargiraut15) September 17, 2025
हे आकडे पाहिले असता, भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यांमधील रेफरीची संख्या जवळपास सारखीच आहे. त्यामुळे, रमीझ राजांचा आरोप पूर्णपणे निराधार ठरला आहे. आता सोशल मीडियावर त्यांच्या विधानावर जोरदार टीका होत आहे.
मॅच रेफरीला हटवण्याची पाकिस्तानची मागणी आयसीसीने फेटाळल्यानंतर, १७ सप्टेंबर रोजी पाकिस्तानने यूएई विरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिला होता. मात्र, आयसीसीने दबाव टाकल्यानंतर पाकिस्तानला शेवटी माघार घ्यावी लागली आणि निर्धारित वेळेपेक्षा एक तास उशिरा हा सामना सुरू झाला.
आज आफगाणिस्तान आणि श्रीलंका आमनेसामने येणार आहे. जर अफगाणिस्तानने हा सामना जिंकला, तर बांगलादेश स्पर्धेतून बाहेर होईल. अशा परिस्थितीत, टीम इंडियाच्या सुपर-४ वेळापत्रकाबाबत बोलायचं झाल्यास, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला २१ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा खेळला जाईल. त्यानंतर, टीम इंडिया २४ सप्टेंबर आणि २६ सप्टेंबर रोजी ग्रुप-बी मधून पात्र ठरलेल्या इतर दोन संघांविरुद्ध (श्रीलंका, अफगाणिस्तान किंवा बांगलादेश) सामने खेळेल.