फोटो सौजन्य : X
प्रो कबड्डी लीग लवकरच नवा सीजन घेऊन येणार आहे. प्रो कबड्डी लीग सीजन 12 चे ऑक्शन पार पडले. या सीझनमध्ये अनेक नव्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. प्रो कबड्डी लीग सीजन 12 मध्ये सर्वात महागडा खेळाडू हा पवन शेरावत ठरला. तर दुसऱ्या क्रमांकावर मोहम्मदरेझा शार्दुलू हा आहे. पवन शेरावत याला २.६०५ कोटीना तेलगू टायटन्स याने विकत घेतले. पण प्रो कबड्डी लीग मध्ये एक मोठी सर्वांना धक्का बसेल अशी घटना घडली ती म्हणजेच कबड्डीचा दिग्गज रेडर प्रदीप नरवाल याला कोणत्याही फ्रेंचाईजीने विकत घेतले नाही.
प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू प्रदीप नरवालने सोमवारी अचानक कबड्डीतून निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. प्रो कबड्डी लीगच्या १२ व्या हंगामात विक्री न झाल्याने नरवालने निवृत्तीचा मोठा निर्णय घेतला. प्रदीप नरवालची मूळ किंमत २० लाख रुपये होती. क्रीडा प्रसारक सुनील तनेजा यांच्यासोबत लाईव्ह व्हिडिओ दरम्यान निवृत्तीची घोषणा करून परदीप नरवालने कबड्डी चाहत्यांना आश्चर्यचकित केले.
नरवाल यांने असेही सांगितले की ते प्रशिक्षक म्हणून त्यांची दुसरी इनिंग सुरू करणार आहे. प्रदीपने प्रो कबड्डी लीगमध्ये तीन वेळा विजेतेपद जिंकले. परदीप नरवालने पटना पायरेट्ससोबत त्याचा सर्वात आनंदी काळ घालवला. त्याने फ्रँचायझीसोबत पाच हंगाम घालवले आणि सलग तीन वेळा विजेतेपद जिंकले. त्यानंतर परदीप नरवाल सीझन ८ मध्ये यूपी योद्धा संघात सामील झाला. त्याने पटना पायरेट्ससोबत यशाचे शिखर गाठले.
PARDEEP NARWAL ANNOUNCES RETIREMENT💔 The most successful player in Pro Kabaddi History with three Titles, Superstar Pardeep Narwal has announced immediate retirement from Pro Kabaddi Happy Retirement to G.O.A.T of Kabaddi 🐐 pic.twitter.com/3YxPqDGxH3 — The Khel India (@TheKhelIndia) June 2, 2025
२८ वर्षीय परदीप नरवाल हा पीकेएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी रेडर आहे. त्याने आतापर्यंत एकूण १८०१ रेड पॉइंट्स मिळवले आहेत, प्रत्येक सामन्यात सरासरी ९.४७ रेड पॉइंट्स आहेत. आता पीकेएलला परदीप नरवालपासून पुढे जायचे आहे. नरवाल केवळ त्याच्या विक्रमांसाठी लक्षात ठेवला जाणार नाही. उलट, त्याच्या आठवणी जिवंत ठेवल्या जातील, ज्याने लीगच्या ओळखीत त्याच्या कारकिर्दीला आकार दिला.






