फोटो सौजन्य - Punjab Kings/Chennai Super Kings सोशल मीडिया
Punjab Kings vs Chennai Super Kings Toss Update : आयपीएल २०२५ चा २२ वा सामना आज पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये सुरु होणार आहे. आज चेन्नई सुपर किंग्सचा संघ त्यांच्या आयपीएल २०२५ च्या दुसऱ्या विजयाच्या शोधात आहेत तर मागील सामन्यांमध्ये पंजाब किंग्सला गुजरात टायटन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे श्रेयस अय्यरचा संघ या सामन्यांमध्ये विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरेल आणि संघाचा कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्याचे नाणेफेक झाले आहे. या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या आयपीएल २०२५ च्या कामगिरीवर नजर टाकली तर संघाने अत्यंत निराशाजनक कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आहे. आतापर्यत चेन्नई सुपर किंग्सने ४ सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांना फक्त १ सामन्यात विजय मिळाला आहे उर्वरित तीन सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाब किंग्सची आयपीएल २०२५ मधील कामगिरीवर नजर टाकली तर संघाने पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला होता तर मागील सामन्यांमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
🚨 News from New Chandigarh 🚨@PunjabKingsIPL won the toss and elected to bat against @ChennaiIPL in Match 2⃣2⃣
Updates ▶️ https://t.co/HzhV1Vtl1S #TATAIPL | #PBKSvCSK pic.twitter.com/6o3ZWXsnI6
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2025
पंजाब किंग्ज (PBKS) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात आतापर्यंत एकूण ३० सामने खेळले गेले आहेत. यापैकी चेन्नईने १६ सामने जिंकले आहेत तर पंजाबने १४ सामने जिंकले आहेत. पंजाब हा अशा काही संघांपैकी एक आहे ज्यांनी चेन्नईला अनेकदा कठीण स्पर्धा दिली आहे. २०२२ पासून या दोघांमध्ये ५ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी ४ सामने पंजाबने जिंकले आहेत.
श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, प्रियांश आर्य, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, प्रभसिमरन सिंग, नेहल वढेरा, युझवेंद्र चहल, मार्को यांसन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन.
रुतुराज गायकवाड (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, विजय शंकर, एमएस धोनी, नूर अहमद, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, खलील अहमद, मथिशा पाथिराना, मुकेश चौधरी.