
फोटो सौजन्य - Sri Lanka Cricket
Sri Lanka vs England 1st inning : श्रीलंका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या सुपर 8 चा दुसरा सामना खेळवला जात आहे. या सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या कर्णधारांना नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचे निर्णय घेतला होता. पहिले फलंदाजी करत इंग्लंडच्या संघाने श्रीलंकेसमोर 147 धावांचे लक्ष उभे केले आहे. आजच्या सामन्यात इंग्लंडची फलंदाजी पूर्णपणे फेल झाली. श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडचे फलंदाज पूर्णपणे खचले आणि मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. आजचा सामना श्रीलंकेला जिंकायला 147 धावांची गरज आहे.
इंग्लंडच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर फिल्ल सॉल्ट आणि विल जॅक्सला वगळता इतर कोणताही खेळाडू हा 20 चा आकडा पार करू शकला नाही. फिल्ल सॉल्ट याने पहिला इनिंगमध्ये फलंदाजी करत 40 चेंडूंमध्ये 62 धावा केल्या यामध्ये त्याने दोन षटकार आणि सहा चौकार मारले. तर इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जॉस बटलर याने 6 धावा केल्या आणि दूनित वेल्लालागे याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. जॅकब बेथल याने 3 धावा केल्या तर टॉम बॅनटोन हा 6 धावा करून पवेलियनमध्ये परतला. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक याने 14 धावा केल्या तर सॅम करन याने 11 धावा.
A massive effort from the boys to keep England to 146/9. We need 147 runs to secure the win. Let’s chase this down, Lions!🔥#SLvENG #T20WorldCup #SriLankaCricket pic.twitter.com/d7nEf2hetH — Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) February 22, 2026
विल जॅक्स देखील फार काही करू शकला नाही त्यांनी 21 धावा केल्या आणि दिलशान मधुशंका याने त्याला बाद केले. श्रीलंकेच्या गोलंदाजी बद्दल सांगायचं झाले तर दुनीत वेल्लालागे कमालीची गोलंदाजी केली. दुनीत वेल्लालागे संघासाठी तीन विकेट्स नावावर केले. तर महेश तीक्ष्णा याच्या हाती 2 विकेट्स लागले. दुशांत चमीरा याने संघाला एक विकेट मिळवून दिला. दिलशांत मधुशंका याला आज प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले होते त्यांनी संघाला दोन विकेट्स मिळवून दिले.