फोटो सौजन्य : JioHotstar
क्वालिफायर २ चा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर पार पडला. या सामन्यामध्ये पंजाब किंग्स आणि् मुंबई इंडीयन्स हे दोन संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात मुबंईच्या संघाची फलंदाजी चांगली राहिली पण गोलंदाजांनी विशेष कामगिरी केली नाही त्यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने संघासाठी नाबाद खेळी खेळली आणि संघाला फायनलपर्यत नेले. आता मुंबई इंडीयन्सच्या संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या पुर्णपणे खचला आहे. त्याने पराभवानंतर त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आयपीएल २०२५ क्वालिफायर-२ मध्ये मुंबई इंडियन्सचा सामना पंजाब किंग्जशी झाला. या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नाबाद ८७ धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जने मुंबईचा ५ गडी राखून पराभव केला. या सामन्यातील विजयासह पंजाब संघाने ११ वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता ३ जून रोजी अंतिम फेरीत पंजाबचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचे जेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले. पंजाबकडून झालेल्या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या खूप निराश दिसत होता. सामन्यानंतर त्याने मुंबईच्या पराभवाची जबाबदारी स्वतःवर घेतली.
मुंबई इंडियन्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जला २०४ धावांचे लक्ष्य दिले. फ्रँचायझीच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले जेव्हा विरोधी संघाने त्यांच्याविरुद्ध २०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य सहज गाठले. पंजाब किंग्जच्या फलंदाजीबद्दल बोलताना, सामन्यानंतरच्या सादरीकरणात हार्दिकने श्रेयस अय्यरने लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या पद्धतीचे कौतुक केले.
Hardik Pandya said, “Shreyas Iyer played an amazing knock, he played well under pressure”. pic.twitter.com/YDMjgS4YwK
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 1, 2025
हार्दिक पुढे म्हणाला, हो नक्कीच, विशेषतः श्रेयसने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्याने संधी घेतल्या आणि त्याने खेळलेले काही शॉट्स उत्तम होते. “मी दोष घेतो. कदाचित मी माझ्या खेळाडूंना थोडे चांगले व्यवस्थापित करू शकलो असतो. मला वाटते की ते बरोबरीचे होते, परंतु गोलंदाजी युनिट म्हणून ते एक उत्तम नियोजन होते , महत्त्वाच्या मोठ्या सामन्यात ते खरोखर शांत होते, त्यांनी आमच्यावर दबाव आणला आणि आम्ही चांगली कामगिरी करू शकलो नाही.”
मुबंईच्या संघाने शेवटचे आयपीएलचे जेतेपद हे २०२० मध्ये जिंकले होते त्यानंतर संघ फार काही चांगली कामगिरी करु शकला नाही. मागील सिझनमध्ये संघाने निराशाजनक कामगिरी केली होती त्यामुळे आता हार्दिक पांड्याच्या कप्टन्सीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.