
IND Vs AFG Live: 'कृष्णा' कडाडला! 5 ओव्हर्समध्ये 2 मेडन अन्...; प्रसिद्धच्या माऱ्यासामोर पठाण हादरले
अफगणिस्तानच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहीम झरदान यांनी अफगणिस्तानच सुरुवात केली होती. मात्र दोन्ही फलंदाज स्वस्तात परतले. त्यापाठोपाठ रहमत शाह आणि कर्णधार शाहिदी देखील लवकर आउट झाले. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने शानदार गोलंदाजी केली.
Edged and into Rohit Sharma's safe hands 🫴👏 Prasidh Krishna gives #TeamIndia the early strike! 🔥 Updates ▶️ https://t.co/kHgF4bqTg3#INDvAFG | @IDFCFIRSTBank | @prasidh43 | @ImRo45 pic.twitter.com/yLVkH2D7gA — BCCI (@BCCI) June 20, 2026
प्रसिद्ध कृष्णाने एकूण 5 ओव्हर्स टाकल्या. त्यामध्ये प्रसिद्ध कृष्णाने 2 मेडन ओव्हर टाकल्या. तर त्याने 3 ओव्हर्समध्ये अफगणिस्तानच्या पहिल्या चारही फलंदाजांची दांडी गूल केली. प्रसिद्ध कृष्णाने अफगणिस्तानची अक्षरक्ष वाट लावली. त्यामुळे अफगणिस्तानचा संघ अडचणीत सापडला आहे.
प्रसिद्ध कृष्णाने आज भेदक आणि अचूक गोलंदाजी केली. त्याने एकूण 5 ओव्हर्स टाकल्या. त्यातील 2 ओव्हर्स त्याने मेडन टाकल्या. उरवीरत तीन ओव्हर्समध्ये त्याने 4 विकेट्स घेत 6 रन्स दिले. आता पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत प्रसिद्ध कृष्णाचा समावेश झाला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मालिका आधीच जिंकली आहे. आता भारतीय संघ अफगाणिस्तानला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्नात असेल.
‘गंभीरला हटवा अन् धोनीला…’; भारतीय क्रिकेटमध्ये अंतर्गत वाद? ‘या’ खेळाडूने केली मोठी मागणी
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील चेपॉकची खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हींसाठी उपयुक्त ठरू शकते. रेकॉर्ड्स पाहिले असता, या मैदानावर फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे आणि अफगाण संघात एक चांगला फिरकी गोलंदाज आहे. परंतु, गेल्या काही सामन्यांमध्ये येथे मोठी धावसंख्या देखील उभारण्यात आली आहे. चेन्नईमध्ये सामान्यतः धावांचा पाठलाग करणे हा योग्य निर्णय मानला जातो, कारण संध्याकाळच्या वेळी फलंदाजी करणे सोपे होते. परंतु, चेपॉकची खेळपट्टी कालांतराने संथ होऊ शकते.
भारत : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), इशान किशन, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्ष दुबे, गुरनूर ब्रार, प्रसिध कृष्णा, प्रिन्स यादव.
अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी, दरविश रसूली, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, राशिद खान, अल्लाह गझनफर, फरीद अहमद, झिया-उर-रहमान.