‘द लल्लनटॉपला’ दिलेल्या मुलाखतीदरम्यान, गेल्या काही वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाला इतका संघर्ष का करावा लागला आहे, असे प्रश्न विचारले असता, एस. श्रीसंतने थेट गंभीरच्या कार्यकाळाला जबाबदार धरले. त्याने प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरच्या कसोटी कामगिरीवर टीका केली आहे. तो म्हणाला परदेशात मालिका हरणे ही मोठी समस्या नाही, पण भारतासारखा बलाढ्य संघ मायदेशात, आधी न्यूझीलंडकडून आणि नंतर दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिका हरल्यास प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. याच कारणामुळे भारतीय संघ २०२७ च्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता दिसत आहे.
एस श्रीसंत म्हणाला, “प्रशिक्षक बदला. भारतीय संघाला प्रशिक्षकाची नाही, तर मार्गदर्शकाची गरज आहे. मला गौतम गंभीरच्या प्रशिक्षण शैली व रणनीतीबद्दल आक्षेप आहे. खेळाडूंवर खूप जास्त दबाव असतो. या स्तरावर तुम्हाला एका मार्गदर्शकाची गरज असते. धोनी कधीही खेळाडूंवर दबाव टाकत नाही आणि गोष्टी मनासारख्या न झाल्यास त्यांना संघातून वगळतो.”
गंभीरवर आपला राग व्यक्त करताना श्रीसंत स्पष्टपणे म्हणाला, ‘मित्रा, आधी प्रशिक्षक बदला. भारताला सध्या मुख्य प्रशिक्षकाची गरज नाही, तर एका मार्गदर्शकाची गरज आहे.’ खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यातील संबंधांबद्दल स्पष्टीकरण देताना तो पुढे म्हणाला, ‘तुम्ही खेळाडूंना मैदानावर आणि ड्रेसिंग रूममध्ये, सर्वप्रथम भावासारखी वागणूक दिली पाहिजे.’
खेळाडू जिंकल्यावर त्यांच्यासोबत आनंद साजरा करणे आणि हरल्यावर राग व्यक्त करणे, हे योग्य नाही. तुम्ही देशासाठी उत्कृष्ट क्रिकेट खेळलात पण याचा अर्थ असा नाही की सध्या खेळणारे खेळाडू मेहनत करत नाहीत किंवा प्रयत्न करत नाहीत. म्हणून, प्रशिक्षकाऐवजी संघासोबत एक मार्गदर्शक ठेवा.
Virat-Rohit 2027 चा वर्ल्ड कप खेळणार? क्रिकेट चाहत्यांना धक्का? BCCI सचिव म्हणाले…






