Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या गोल्डन गर्लचा बॉक्सिंगमध्ये तुफान पंच! प्रीती पवारने CWG 2026 मध्ये जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक

preeti won gold in boxing cwg 2026 glasgow: भारतीय बॉक्सर प्रीती पवारने ५४ किलो वजनी गटात कॅनडाच्या स्कारलेट डेलगाडोवर दणदणीत विजय मिळवून सुवर्णपदक पटकावले. या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताचे हे सहावे सुवर्णपदक आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 01, 2026 | 05:40 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • भारताच्या लेकीचा बॉक्सिंगमध्ये तुफान पंच
  • प्रीती पवारने CWG 2026 मध्ये जिंकले पहिले सुवर्णपदक
  • प्रीती पवारने अंतिम सामना एकतर्फी जिंकला
राष्ट्रकुल क्रीडा २०२६ (Commonwealth Games 2026) स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारतीय महिला बॉक्सरांनी शानदार सुरुवात केली. भारतीय बॉक्सर प्रीती पवारने महिलांच्या ५४ किलो वजनी गटात पहिले सुवर्णपदक पटकावले. प्रीतीने अंतिम सामना जिंकून देशाला राष्ट्रकुल क्रीडामधील बॉक्सिंग स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर लगेचच जस्मिन लंबोरियाने महिलांच्या ५७ किलो वजनी गटात दुसरे सुवर्णपदक पटकावले. प्रीतीने संपूर्ण लढतीत उत्कृष्ट टेकनिक, संयम आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले आणि तिन्ही फेऱ्यांमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यावर आघाडी कायम ठेवली.

Commonwealth Games 2026: जॅस्मिन लांबोरियाचा बॉक्सिंगमध्ये धुमाकूळ! भारताला दिवसातून दुसरे गोल्ड पदक, 5-0 ने वॉल्शला हरवलं

प्रीती पवारने अंतिम सामना एकतर्फी जिंकला

महिलांच्या ५४ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात प्रीती पवारचा सामना कॅनडाच्या स्कारलेट सवाना डेलगाडोशी झाला. भारतीय बॉक्सरने सुरुवातीपासूनच लढतीवर आपली पकड कायम ठेवली. पहिल्या फेरीत दोन्ही खेळाडूंमध्ये चुरशीची लढत झाली, पण प्रीतीने आपल्या अचूक ठोक्यांनी पंचांना प्रभावित केले. पाचही पंचांनी पहिली फेरी १०-९ अशी प्रीतीच्या बाजूने दिली.

प्रीतीने दुसऱ्या फेरीत पूर्णपणे वर्चस्व गाजवले

दुसऱ्या फेरीत डेलगाडोने आक्रमक सुरुवात केली, पण प्रीतीने उत्कृष्ट फूटवर्क आणि अचूक पंचने तिला सातत्याने मागे ढकलले. भारतीय बॉक्सरचे सरळ आणि शक्तिशाली पंचमुळे डेलगाडो दबावाखाली आली. लढतीदरम्यान त्या कॅनेडियन खेळाडूला स्टँडिंग काउंटही देण्यात आला. पाचही पंचांनी एकमताने दुसऱ्या फेरीतही प्रीतीला विजेती घोषित केले.

अंतिम फेरीत डेलगाडोने अथकपणे आक्रमण करत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण प्रीती शांत राहिली. तिने शांतपणे सामना खेळला आणि आपली आघाडी कायम राखली. सामन्यानंतर, पंचांनी एकमताने प्रीती पवारला विजेती घोषित केले. यासह, तिने २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमधील भारताचे पहिले सुवर्णपदक मिळवले.

जस्मिन लंबोरियानेही जिंकले सुवर्णपदक

प्रीतीच्या विजयानंतर लगेचच, भारताच्या जस्मिन लंबोरियाने महिलांच्या ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात नॉर्दर्न आयर्लंडच्या मायकेला वॉल्शला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. जस्मिनने पहिला राऊंड ३-२ अशा विभाजित निर्णयाने जिंकला. दुसऱ्या राऊंडमध्ये तिने आणखी चांगली कामगिरी केली आणि एकमताने आघाडी घेतली. निर्णायक राऊंडमध्ये मायकेला वॉल्शने जोरदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु जस्मिनने संयमाने सामन्यावर नियंत्रण ठेवले. जस्मिन लंबोरियाच्या विजयामुळे भारताने बॉक्सिंगमधील आपले दुसरे सुवर्णपदक निश्चित केले.

मैदानावर वैर, बाहेर मैत्री? भारतीय क्रिकेटरने पाक क्रिकेटपटूला मारली मिठी; Viral Video मुळे सोशल मीडियावर मोठा वाद

Web Title: Preeti pawar won gold medal in boxing commonwealth games 2026 glasgow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • Boxing
  • commonwealth games 2026
  • gold medal

संबंधित बातम्या

टग ऑफ वॉरमध्ये बुलढाण्याचा डंका; राज्यस्तरीय स्पर्धेत १५ आणि १७ वर्षांच्या गटात दोन गोल्ड मेडल
1

टग ऑफ वॉरमध्ये बुलढाण्याचा डंका; राज्यस्तरीय स्पर्धेत १५ आणि १७ वर्षांच्या गटात दोन गोल्ड मेडल

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक
2

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार
3

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.