
कोण आहेत मनीषा भानवाला? जागतिक कुस्ती स्पर्धेत गोल्ड जिंकून भारताचा मान उंचावला
मनीषा भनवाला या हरियाणातील जींद येथील रहिवासी असून त्यांचे कुटुंब शेती व्यवसायाशी संबंधित आहे. त्यांच्या कुटुंबात खेळांची परंपरा आहे. त्यांचे भाऊ रिंकू हे कबड्डीपटू आहेत, तर त्यांच्या वहिनी ममता सिहाग यादेखील कुस्तीपटू आहेत. कुटुंबातील खेळाचे वातावरण आणि गावातील क्रीडा संस्कृतीमुळे मनीषा यांना कुस्तीची आवड निर्माण झाली.
IND A vs NZ A: 9 डावात 4 Ducks! न्यूझीलंडमध्ये यशस्वी जायस्वालचे हाल, धावांचा दुष्काळ
कुस्तीच्या कारकिर्दीत त्यांनी विविध वजनी गटांमध्ये सहभाग घेतला. ६२ किलो, ६५ किलो आणि ५७ किलो अशा वेगवेगळ्या गटांमध्ये त्यांनी स्पर्धा केली. मात्र, २९व्या वर्षी त्यांनी ५९ किलो या ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट नसलेल्या वजनी गटात जागतिक स्तरावर सर्वोच्च यश मिळवले.
मनीषा भनवाला यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ म्हणजे त्यांच्या वडिलांचे निधन. २०२२ मध्ये मंगोलियात होणाऱ्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी रवाना होण्याच्या आदल्या रात्री त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांचे वडील सुरेश हे एका जागरणासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे मनीषा पूर्णपणे खचल्या होत्या. त्यांना घराबाहेर पडण्याचीही इच्छा होत नव्हती. काही काळ त्यांनी कुस्ती सोडण्याचा विचारही केला.
MANISHA IS WORLD CHAMPION!!!! 🏆🇮🇳 INDIA FINALLY HAS ITS FIRST-EVER WOMEN’S WORLD WRESTLING CHAMPION! 🥹 Manisha Bhanwala defeats USA’s Abigail Nette 🇺🇸 8-6 in the Women’s 59kg Finals India wins a World Wrestling Championship title after 16 long years wait!!! HISTORY MADE! FINALLY, AN INDIAN WOMAN IS A WORLD CHAMPION! 💪❤️ https://t.co/EcCiHynXJg — The Khel India (@TheKhelIndia) October 30, 2026
मात्र, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीने त्यांनी पुन्हा कुस्तीच्या मैदानात पाऊल ठेवले. कठीण परिस्थितीतही त्यांनी सराव सुरू ठेवला आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली.
जागतिक कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मनीषा यांनी अमेरिकेच्या एबिगेल नेट यांच्याविरुद्ध ८-६ अशी बाजी मारली. या विजयामुळे त्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला बनल्या. विजयानंतर त्यांनी आपल्या आई-वडिलांचे छायाचित्र असलेला पांढरा टी-शर्ट प्रेक्षकांसमोर अभिमानाने दाखवला. हा क्षण केवळ एका खेळाडूच्या विजयाचा नव्हता, तर आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या मुलीच्या भावनिक प्रवासाचा होता.
मनीषा भनवाला यांच्या या कामगिरीने भारतीय कुस्तीला नवी ओळख मिळाली आहे. संघर्ष, जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावर जागतिक स्तरावर यश मिळवता येते, हे त्यांनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिले.
Cricket: सुहेल लोखंडेचे आक्रमक अर्धशतक; विन टेंपल क्लबने गाठली थेट PCMC करंडकची सेमीफायनल
Ans: मनीषा भनवाला या हरियाणातील जींद येथील भारतीय कुस्तीपटू आहेत. त्यांनी जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
Ans: मनीषा भनवाला यांनी महिलांच्या ५९ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. अंतिम फेरीत त्यांनी अमेरिकेच्या एबिगेल नेट यांचा ८-६ असा पराभव केला.
Ans: जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला कुस्तीपटू ठरल्या आहेत. त्यांनी हे सुवर्णपदक आपल्या दिवंगत वडिलांना समर्पित केले.