Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prithvi Shaw: साखरपुड्यानंतर अवघ्या ६ महिन्यांत संपलं नातं; पृथ्वी शॉ-आकृती अग्रवाल झाले वेगळे, चीटिंगच्या आरोपांना मिळालं बळ

Prithvi Shaw and akriti Agarwal Call Off Engagement: भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि त्याची होणारी पत्नी, आकृती अग्रवालने, त्याच्यापासून विभक्त झाल्याची घोषणा केली आहे. पृथ्वी आणि आकृतीचा या वर्षी मार्चमध्ये साखरपुडा झाला होता.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 17, 2026 | 04:59 PM
Prithvi Shaw: साखरपुड्यानंतर अवघ्या ६ महिन्यांत संपलं नातं; पृथ्वी शॉ-आकृती अग्रवाल झाले वेगळे, चीटिंगच्या आरोपांना मिळालं बळ
Follow Us
Follow Us:
  • मार्चमध्ये साखरपुडा, सप्टेंबरमध्ये ब्रेकअप
  • पृथ्वी शॉ-आकृती अग्रवाल वेगळे
  • चीटिंगच्या चर्चांना उधाण
भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असलेला सलामीवीर पृथ्वी शॉ प्रोफेशनल आणि वैयक्तिक अशा दोन्ही आयुष्यांत अडचणींचा सामना करत आहे. पृथ्वी पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याची होणारी पत्नी, आकृती अग्रवालने, ६ महिन्यांद्वारे त्याच्यापासून विभक्त झाल्याची बातमी दिली आहे. त्यांच्यात मतभेद झाल्याच्या अफवा काही काळापासून पसरत होत्या, पण आता पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांचे नाते संपल्याची पुष्टी झाली आहे. आकृतीने इन्स्टाग्रामवर शॉपासून विभक्त झाल्याची पोस्ट करत माहिती दिली आहे. तिने असेही लिहिले आहे की हा निर्णय परस्पर संमतीने घेण्यात आला आहे.

Asian Games 2026: ना टॉस, ना सामना! बांग्लादेश थेट सेमीफायनलमध्ये; चीनचं आव्हान संपलं

आकृतीने इन्स्टाग्रामवर केली पोस्ट

 आकृतीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की,  ‘अत्यंत जड अंतःकरणाने मी आज हे सांगत आहे की, मी आणि माझ्या होणाऱ्या पतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यासाठी आमची ध्येये आणि परिस्थिती वेगळी असल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांवर कितीही प्रेम करत असलो आणि एकमेकांची कितीही काळजी घेत असलो, तरी आमचे मार्ग वेगवेगळे आहेत आणि हे आम्ही स्वीकारले आहे. आमच्या जबाबदाऱ्या आणि सध्याची परिस्थिती विचार करून, आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.’

आकृतीने पुढे लिहिले की, ‘मी दोघांसाठीही प्रार्थना करते की, आम्हा दोघांनाही भविष्यात चांगल्या गोष्टी, शांतता आणि आनंद मिळो. मी सर्वांना विनंती करते की या कठीण काळात आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा. तसेच, आमच्या या निर्णयामागील कारणांबाबत कोणत्याही प्रकारचे तर्कवितर्क लावू नयेत किंवा कोणतेही गैरसमज करून घेऊ नयेत.आमची परिस्थिती समजून घेतल्याबद्दल आणि आमच्या प्रयव्हसीचा आदर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.’

सहा महिन्यांच्या आत संबंध तुटले

बऱ्याच काळाच्या नात्यानंतर, क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांचा यावर्षी ८ मार्च रोजी साखरपुडा झाला. ते खूप आनंदी होते आणि त्यांनी आपल्या चाहत्यांसोबत सुंदर फोटो शेअर केले होते. चाहते पृथ्वी शॉच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते, पण साखरपुड्यापासून लग्नापर्यंतचा हा प्रवास कधीच प्रत्यक्षात उतरला नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात कटुता आल्याच्या बातम्या येत होत्या.१७ सप्टेंबर रोजी त्यांनी आपले नाते संपवण्याचा निर्णय घेतला.

२६ वर्षीय पृथ्वी शॉला एकेकाळी भारतीय क्रिकेटचा पुढचा स्टार मानले जात होते. २०१८ मध्ये, वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी शॉने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि शतक झळकावले. परंतु, नंतर त्याचा फॉर्म घसरला आणि त्याला संघातून वगळण्यात आले. सध्या तो देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्येही आपल्या स्थानासाठी संघर्ष करत आहे.

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सीरीजसाठी टीम इंडिया जाहीर; रोहित-विराट पुन्हा मैदानात, ‘या’ १५ खेळाडूंना संधी

Web Title: Prithvi shaw akriti agarwal engagement breakup after 6 months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • cricket
  • Engagement
  • Prithvi Shaw

संबंधित बातम्या

Cricket Scorer Career: क्रिकेट स्कोरर कसा बनतात? पात्रता, काम आणि पगार जाणून घ्या एका क्लिकवर..
1

Cricket Scorer Career: क्रिकेट स्कोरर कसा बनतात? पात्रता, काम आणि पगार जाणून घ्या एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.