Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket: पिंपरी चिंचवड करंडकात लक्ष्य ॲकॅडमीचा धमाका! कुंदन कुमारच्या अष्टपैलू कामगिरीने थेट…

Cricket: निलेश दिघेने केवळ १९ चेंडूंत ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५८ धावा करत धावसंख्येला मोठी चालना दिली. विक्रम भेगाडेने ४२, तर गणेश धामणकरने २८ धावांचे योगदान दिले

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 29, 2026 | 09:45 PM
प्रितम सूर्यवशींची अप्रतिम गोलंदाजी

प्रितम सूर्यवशींची अप्रतिम गोलंदाजी

Follow Us
Follow Us:
  • पिंपरी चिंचवड करंडकमध्ये लक्ष्य, मावळ वॉरीयर्स विजयी
  • लक्ष्य क्रिकेट ॲकॅडमीचा ५२ धावांनी झाला विजय 
  • मावळ वॉरीयर्सचा १३३ रन्सने दणदणीत विजय
Cricket: पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘पिंपरी चिंचवड करंडक’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत लक्ष्य क्रिकेट ॲकॅडमी आणि मावळ वॉरीयर्स या संघांनी दमदार विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.हिंजवडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत लक्ष्य क्रिकेट ॲकॅडमीने प्राधिकरण जिमखाना संघाचा ५२ धावांनी पराभव केला.

लक्ष्यच्या विजयात कुंदन कुमारच्या अष्टपैलू कामगिरीचा महत्त्वाचा वाटा राहिला. प्रथम फलंदाजी करताना लक्ष्य क्रिकेट ॲकॅडमीने २० षटकांत ९ गडी गमावून १५९ धावा केल्या. कुंदन कुमारने ३९, अमेय जाधवने २२, तर जयेश राठोडने १८ धावांचे योगदान दिले. प्राधिकरण जिमखान्याकडून अरूश गुप्ताने १३ धावांत पाच गडी बाद करत भेदक गोलंदाजी केली.

Cricket: अजित वाडेकर ॲकॅडमीचा जलवा; ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक‌’मध्ये सलग 2 दणदणीत विजय

प्रितम सूर्यवशींची अप्रतिम गोलंदाजी

विजयासाठी १६० धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या प्राधिकरण जिमखान्याचा डाव १९.५ षटकांत १०७ धावांवर आटोपला. आदित्य भोसलेने ४६ धावांची झुंजार खेळी करत प्रतिकार केला. मात्र, लक्ष्यच्या प्रितम सूर्यवंशीने २८ धावांत चार गडी बाद करत प्राधिकरणच्या फलंदाजीला खिंडार पाडले. कुंदन कुमारने दोन गडी बाद करत संघाच्या विजयाला हातभार लावला. अष्टपैलू कामगिरीसाठी कुंदन कुमारला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

 मावळ वॉरीयर्सची धावांची आतषबाजी

दुसऱ्या सामन्यात जशन सिंगच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर मावळ वॉरीयर्सने पीसीएमसी क्रिकेट ॲकॅडमीचा तब्बल १३३ धावांनी पराभव केला. या विजयासह मावळ वॉरीयर्सनेही उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले.प्रथम फलंदाजी करताना मावळ वॉरीयर्सने २० षटकांत ८ गडी गमावून तब्बल २५७ धावांचा डोंगर उभा केला. जशन सिंगने अवघ्या ४४ चेंडूंत ७ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ८२ धावांची आक्रमक खेळी केली.

निलेश दिघेने केवळ १९ चेंडूंत ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५८ धावा करत धावसंख्येला मोठी चालना दिली. विक्रम भेगाडेने ४२, तर गणेश धामणकरने २८ धावांचे योगदान दिले. प्रचंड धावसंख्येचा पाठलाग करताना पीसीएमसी क्रिकेट ॲकॅडमीचा डाव २० षटकांत ७ गडी बाद १२४ धावांवर थांबला. समर्थ जगतापने २६, तर अर्जुन साळुंकेने ३६ धावा केल्या. मावळ वॉरीयर्सकडून चैतन्य कोंडभर आणि युवराज गोळे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. ८२ धावांच्या आक्रमक खेळीसाठी जशन सिंगला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Cricket: एक शतक अन् २५७ रन्सचे विजय! युनिटी करंडकात आर्यन्स क्रिकेट अकादमीची शानदार कामगिरी

सामन्यांचा संक्षिप्त निकाल

पहिली बाद फेरी

लक्ष्य क्रिकेट ॲकॅडमी : २० षटकांत ९ गडी बाद १५९ धावा — कुंदन कुमार ३९, अमेय जाधव २२, जयेश राठोड १८; अरूश गुप्ता ५-१३.

प्राधिकरण जिमखाना : १९.५ षटकांत सर्वबाद १०७ धावा — आदित्य भोसले ४६, अंकुर मिश्रा १४; प्रितम सूर्यवंशी ४-२८, कुंदन कुमार २-४.
सामनावीर : कुंदन कुमार.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मावळ वॉरीयर्सने किती रन्सने जिंकला सामना?

    Ans: ‘पिंपरी चिंचवड करंडक’मध्ये मावळ वॉरीयर्सने १३३ रन्सने सामना जिंकला आहे.

  • Que: कुंदन कुमारने विजयात काय योगदान?

    Ans: लक्ष्य क्रिकेट ॲकॅडमीकडून लक्ष्य क्रिकेट अकादमीने अष्टपैलू कामगिरी केली.

Web Title: Lakshya academy wins the pcmc cricket league hinjewadi stadium sports tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • cricket
  • PCMC News
  • Sports News

संबंधित बातम्या

पुणेकरांनो धावण्यासाठी व्हा तयार! ‘या’ दिवशी रंगणार भव्य Marathon स्पर्धा, तब्बल 10 हजार…
1

पुणेकरांनो धावण्यासाठी व्हा तयार! ‘या’ दिवशी रंगणार भव्य Marathon स्पर्धा, तब्बल 10 हजार…

Chiplun: जगात भारी आमचे रत्नागिरी! १३ जणांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; हैदराबादमध्ये होणार सामने
2

Chiplun: जगात भारी आमचे रत्नागिरी! १३ जणांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; हैदराबादमध्ये होणार सामने

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मीनाक्षी शिंदे यांचा ठाणे जिल्हा महिला प्रमुखपदाचा राजीनामा
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मीनाक्षी शिंदे यांचा ठाणे जिल्हा महिला प्रमुखपदाचा राजीनामा

Cricket: विराज फराटेची वादळी खेळी! ७३ धावांच्या जोरावर राजस्थान रॉयलने प्रतिस्पर्ध्यांला लोळवले
4

Cricket: विराज फराटेची वादळी खेळी! ७३ धावांच्या जोरावर राजस्थान रॉयलने प्रतिस्पर्ध्यांला लोळवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.