Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK vs PBKS : डीसी, आरसीबीला बाजूला सारत निवडला हिरा! प्रियांशचे शतक अन् प्रीती झिंटाच्या चेहऱ्यावर फुलले हसू, पहा व्हिडिओ.. 

काल मंगळवार ८ एप्रिल रोजी आयपीएल २०२५ च्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. या सामन्यात प्रियांश आर्यने शतक झळकावले. त्याच्या शतकानंतर प्रीती झिंटाने आनंद व्यक्त केला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 09, 2025 | 09:41 AM
CSK vs PBKS: DC, RCB aside, chose Hira! Priyansh's century and Preity Zinta's face filled with smiles, watch the video..

CSK vs PBKS: DC, RCB aside, chose Hira! Priyansh's century and Preity Zinta's face filled with smiles, watch the video..

Follow Us
Close
Follow Us:

CSK vs PBKS : आयपीएल २०२५ च्या १८  व्या हंगामातील २२ व सामना काल मंगळवार ८ एप्रिल रोजी पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई संघाचा पराभव केला. चेन्नई सुपर किंग्सचा हा सलग ४ था पराभव ठरला आहे. अय्यरसेनेने हा सामना १८ धावांनी आपल्या खिशात टाकला. सामन्यापूर्वी पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो किती योग्य होता हे पंजाबने दाखवून दिले. प्रियांश आर्यच्या दमदार शतकाच्या जोरावर पंजाब किंग्जने चेन्नईसमोर २१९ धावांचे लक्ष्य उभे केले. प्रतिउत्तरात चेन्नई संघाला ५ गडी गामावत २०१ धावाच करता आल्या. दरम्यान पंजाबच्या डाव सुरू असताना प्रियांशने शतक ठोकताच पंजाबची मालकीण प्रीती झिंटा खुश दिसून आली. या संदर्भातील एक व्हिडिओ देखील व्हायरल हॉट आहे.

हेही वाचा : MI vs RCB : ‘आयपीएलमध्ये स्थिर होण्यास ३-४ वर्षे…’: आरसीबीचा ‘हा’ तडाखेबाज फलंदाज असे का बोलला? वाचा सविस्तर..

पंजाबविरूद्धच्या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांच्या मर्यादा दिसून आल्या. पंजाबच्या फलंदाजांनी  चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. चेन्नईकडून  खलील अहमद आणि आर. यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. परंतु या दोन्ही गोलंदाजांची इकॉनॉमी प्रति ओव्हर १० पेक्षा जास्त धावा राहिली. तसेच नूर अहमद आणि मुकेश चौधरी यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.

Majestic is an understatement! 👍🏻💥 Gen Bold Star, #PriyanshArya complete his maiden #TATAIPL fifty in some style! 👊🏻 Watch the LIVE action ➡ https://t.co/tDvWovyN5c#IPLonJioStar 👉 PBKS 🆚 CSK | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar! pic.twitter.com/ViCDyXmIpd — Star Sports (@StarSportsIndia) April 8, 2025

प्रियांशचे शतक अन् प्रीती झिंटाचा खुश..

काल झालेल्या सामन्यात, पंजाब किंग्जकडून युवा सलामीवीर फलंदाज प्रियांशने  दमदार शतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने केवळ   ३९ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. आयपीएल कारकिर्दीतील प्रियांश आर्यचे हे पहिले शतक आहे. यासोबतच, हे आयपीएल २०२५ मधील दुसरे शतक ठरले आहे. याआधी हैद्राबदचा खेळाडू इशान किशनने शतक ठोकले होते. प्रियांशच्या शतकानंतर, प्रीती झिंटा स्टेडियममधून टाळ्या वाजवताना दिसून आली. तिचा आनंद चेहऱ्यावर झळकत होता. आजच्या खेळीत त्याने प्रियांश आर्यने एकूण १०३ धावा केल्या.  शतक पूर्ण करण्यासाठी त्याने केवळ ३९ चेंडू घेतले. प्रियांशला चेन्नई सुपर किंग्जचा फिरकी गोलंदाज नूर अहमदने तंबूत परत पाठवले.  या धडाकेबाज डावखुऱ्या फलंदाजाने शशांक सिंगसोबत सहाव्या गड्यासाठी एकूण ७१ धावांची भागीदारी रचली.

हेही वाचा : Harmanpreet Kaur : श्रीलंकेत २७ पासून तिरंगी एकदिवसीय मालिकेचा थरार, हरमनप्रीत कौर सांभाळणार भारताची धुरा

प्रीती झिंटाने निवडला हिरा..

आयपीएल २०२५ च्या लिलावामध्ये प्रीती झिंटाने प्रियांश आर्यला खरेदी करण्याचा रस दाखवला होता. आर्यला खरेदी करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि आरसीबी यांच्यामध्ये स्पर्धा दिसून आली होती. परंतु, शेवटी प्रीती झिंटाने ही स्पर्धा जिंकली आणि आर्यला पंजाबच्या ताफ्यात सामील करून घेतले. पंजाब किंग्जने प्रियांश आर्यला एकूण ३.८० कोटी रुपयांना विकत घेतले. एकूणच आर्यची कामगिरी बघता प्रीती झिंटाने हिराच निवडला असे बोलले जात आहे.

Web Title: Priyansh selected to leave dc rcb aside his century and preity zinta was happy csk vs pbks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 09:40 AM

Topics:  

  • CSK vs PBKS
  • IPL 2025
  • Preity Zinta
  • Priyansh Arya

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.