देवदत्त पडिकल(फोटो-सोशल मीडिया)
MI vs RCB : वानखेडे स्टेडियमवर ७ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी धुव्वा उडवला. आरसीबीने एमआयला त्यांच्याच घरच्याच मैदानावर पराभूत करण्याचा पराक्रम करून दाखवला. मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२५ मध्ये विजयासाठी खूपच संघर्ष करावा लागत आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करत २२१ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रतिउत्तरात मुंबई २०९ धावाच करता आल्या. आरसीबीच्या विजयात देवदत्त पडिकलने महत्वाची भूमिका वठवली. त्याने संघाला गरज असताना २२ चेंडूत ३७ धावांची खेळी केली. या विजयानंतर त्याने आपली भावना व्यक्त केली आहे.
तरुण फलंदाज देवदत्त पडिकलचा असा विश्वास आहे की, फ्रँचायझी संघ सतत बदलणे खूप आव्हानात्मक असते, ज्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये क्रिकेटपटू म्हणून स्वतःला स्थापित करण्यासाठी त्याला तीन ते चार वर्षे लागली. पडिकलने २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कडून आपल्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली. आरसीबीमध्ये दोन वर्षे घालवल्यानंतर, तो पुढील दोन वर्षे राजस्थान रॉयल्सशी संबंधित होता.
हेही वाचा : Harmanpreet Kaur : श्रीलंकेत २७ पासून तिरंगी एकदिवसीय मालिकेचा थरार, हरमनप्रीत कौर सांभाळणार भारताची धुरा
हा डावखुरा फलंदाज २०२४ मध्ये लखनौ सुपर जायंट्सशी संबंधित होता पण आता तो चालू हंगामात आरसीबीमध्ये परतला आहे. जेव्हा तुम्ही संघात तुमचे स्थान निश्चित करू शकत नाही, तेव्हा ते निश्चितच आव्हानात्मक असते,” असे पडिक्कल यांनी सोमवारी मुंबई इंडियन्सवर आरसीबीच्या १२ धावांनी विजयानंतर सांगितले. मी २१ वर्षांचा असताना आरसीबीमध्ये होतो आणि त्यानंतर मला दुसऱ्या फ्रँचायझी संघात सामील व्हावे लागले. ही थोडी अस्वस्थ परिस्थिती आहे.
हेही वाचा : GT vs RR : गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, आज रंगणार सामना; गिलची सेना करणार सॅमसनसेनेशी दोन हात..
७ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव केला. आरसीबीने एमआयला त्यांच्याच घरच्याच मैदानावर चितपट केले होते. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करत २२१ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रतिउत्तरात मुंबई ९ गड्यांच्या बदल्यात २०९ धावाच करू शकला.