चेन्नई सुपर किंग्सचा डाव कोसळला (फोटो- ट्विटर)
राजस्थान रॉयल्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
चेन्नई सुपर किंग्सची फलंदाजी गडबडली
संजू सॅमसन आणि आयुष म्हात्रेने केली निराशा
Tata IPL 2026 CSK vs RR Live Updates: सध्या आसाम राज्यातील गुवाहाटी येथे बरसपारा क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात (CSK vs RR) सामना सुरू आहे. दरम्यान राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने धावा केल्या. चेन्नईने (IPL 2026) राजस्थानला धावांचे लक्ष्य दिले आहे.
चेन्नई सुपर किंग्सकडून प्रथम संजू सॅमसन आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड खेळण्यासाठी उतरले. संजू सॅमसन केवळ 6 धावा करून बाद झाला. तर कर्णधार ऋतुराज गायकवाड देखील 6 धावा करून बाद झाला. तसेच युवा फलंदाज आयुष म्हात्रे पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तर मॅथ्यू शॉर्ट केवळ 2 धावा करून बाद झाला.
तर सरफराज खानने 12 चेंडूत 17 धावा कडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो देखील 17 धावा करून बाद झाला. कार्तिक शर्माने 18 धावा केल्या. शिवम दुबेने आल्या आल्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. मात्र चौथ्याच चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नांत बाद झाला. मॅट हेनरी केवळ 5 धावा करून बाद झाला.
CSK vs RR Live: गुवाहाटीत नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने! CSK ला रोखण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय
राजस्थानच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करून चेन्नईच्या फलंदाजीला अंकुश लावला. गोलंदाज बर्गरने 3, रवींद्र जाडेजाने दोन विकेट घेतल्या. संदीप शर्माने 1 विकेट घेतली. तसेच जोफरा आर्चरने एक विकेट घेतली.
Match No. 3: WICKET! Over: 15.3 Matt Henry 5(7) ct & b Ravi Bishnoi, Chennai Super Kings 94/9 https://t.co/UzbuFk5G26 #TATAIPL | #RRvCSK — IndianPremierLeague (@IPL) March 30, 2026
चेन्नई सुपर किंग्स: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), आयुष म्हात्रे, मॅथ्यू शॉर्ट, शिवम दुबे, प्रशांत वीरजेमी ओव्हरटन, नूर अहमद, खलील अहमद, मॅट हेन्री, अंशुल कंबोज, राहुल चहर, श्रेयस गोपाल, सरफराज खान, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, अकील हुसैन, झॅक फॉल्क्स, कार्तिक शर्मा, अमन खान, उर्विल पटेल, देवाल्ड ब्रेव्हिस (दुखापतग्रस्त), एमएस धोनी (दुखापतग्रस्त).
CSK चा मोठा ‘गेम’! ‘यलो आर्मी’ला मोठा धक्का; संजू अन् ऋतुराजचा RR विरुद्ध फ्लॉप शो
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, दासुन शनाका, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, रवी बिश्नोई, ॲडम मिल्ने, शुभम दुबे, डोनोव्हन फरेरा, लुआन-ड्रे प्रिटोरियस, रवी सिंग, युधवीर सिंग चरक, नांद्रे बर्गर, अमन राव पेराला






