Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PSL 2026 : पदार्पण सामन्यात स्टीव्ह स्मिथने पाडला षटकारांचा पाऊस, इस्लामाबाद युनायटेडला 5 गडी राखून केले पराभूत!

स्टीव्ह स्मिथ आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये पदार्पण करणाऱ्या मोठ्या परदेशी नावांच्या यादीत सामील झाला आहे. या सामन्यात स्मिथ मुलतान सुलतान्स संघाकडून खेळला, ज्याने इस्लामाबाद युनायटेडला ५ गडी राखून पराभूत केले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 29, 2026 | 02:27 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

पाकिस्तान सुपर लीग: ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये पदार्पण करणाऱ्या मोठ्या परदेशी नावांच्या यादीत सामील झाला आहे. स्टीव्ह स्मिथने २८ मार्च रोजी इस्लामाबाद युनायटेड आणि मुलतान सुलतान्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात पदार्पण केले. या सामन्यात स्मिथ मुलतान सुलतान्स संघाकडून खेळला, ज्याने इस्लामाबाद युनायटेडला ५ गडी राखून पराभूत केले. स्टीव्ह स्मिथच्या पदार्पणाव्यतिरिक्त, या सामन्यात दोन सख्ख्या भावांची लढतही पाहायला मिळाली. 

एकीकडे, अष्टपैलू असलेला मोठा भाऊ मुलतान सुलतान्सकडून स्टीव्ह स्मिथसोबत खेळत होता, तर दुसरीकडे धाकट्या भावाने या सामन्यात इस्लामाबाद युनायटेडकडून सलामीवीराची भूमिका बजावली. स्टीव्ह स्मिथने इस्लामाबाद युनायटेड आणि मुलतान सुलतान्स यांच्यातील पीएसएल सामन्यात पदार्पण केले. पण त्याला खेळताना पाहता, त्याला कोणतीही अडचण किंवा समस्या असल्याचे दिसले नाही. आपल्या पहिल्याच पीएसएल सामन्यात तो सर्वाधिक षटका र मारणारा फलंदाज ठरला. या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून एकूण १३ षटकार मारले.

IPL मधून माघार घेतलेल्या खेळाडूंवर सुनील गावस्कर नाराज, बीसीसीआयला केले विशेष आवाहन! म्हणाले – दोन वर्षांची बंदी…

प्रथम फलंदाजी करताना इस्लामाबाद युनायटेडने २० षटकांत ८ गडी गमावून ६ षटकारांसह १७१ धावा केल्या. मार्क चॅपमन हा इस्लामाबाद युनायटेडसाठी सर्वात यशस्वी फलंदाज ठरला, त्याने २१ चेंडूंमध्ये २ षटकारांसह ४० धावा केल्या. सलामीवीर समीर मिन्हास, ज्याने २१ चेंडूंमध्ये २८ धावा केल्या, तो संघाचा दुसरा सर्वात यशस्वी फलंदाज होता. मुलतान सुलतान्ससाठी मोमिन कमर हा ३ बळी घेणारा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

STEVEN SMITH ON HIS PSL DEBUT..!! – Hits 3 Sixers, 1 Boundary in his 31 Runs Innings🤩❤pic.twitter.com/85MwHZcNIn — usman (@cricbyusman) March 28, 2026

मुलतान सुलतान्सला १७२ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते, जे त्यांनी १८.४ षटकांत पूर्ण केले. मुलतान सुलतान्सकडून जोश फिलिप्सने ३५ चेंडूंमध्ये ५५ धावा करून सर्वाधिक धावा केल्या. मात्र, स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक षटकार मारले. मुलतान सुलतान्सच्या डावात सात षटकार होते, त्यापैकी तीन स्टीव्ह स्मिथने मारले. पीएसएलमधील आपल्या पदार्पणाच्या डावात त्याने तीन षटकारांसह २१ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या.

मिन्हास बंधू आमनेसामने, कोण जिंकणार?

पीएसएल २०२६ मध्ये स्टीव्ह स्मिथच्या पदार्पणाच्या सामन्यात मिन्हास बंधू पहिल्यांदाच आमनेसामने आले. धाकटा भाऊ समीर मिन्हासने इस्लामाबाद युनायटेडकडून खेळताना २१ चेंडूंमध्ये २८ धावा केल्या. त्याचा मोठा भाऊ, अराफत मिन्हास, मुलतान सुलतान्सकडून खेळताना २२७ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने केवळ ११ चेंडूंमध्ये २५ धावा केल्या. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या अराफत मिन्हासच्या खेळीमुळेच मुलतान सुलतान्सने इस्लामाबाद युनायटेडवर विजय मिळवला.

Web Title: Psl 2026 steve smith hits sixes in his debut match defeats islamabad united by 5 wickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • cricket
  • PSL 2026
  • Sports
  • Steve Smith

संबंधित बातम्या

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह
1

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार
2

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?
3

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.