Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्रर्रर्र PCB ची घरातही इज्जत नाय! PSL मालकाने कायदेशीर नोटीस फाडून दिले थेट उत्तर; ‘या’ वादाचं नेमकं कारण काय?

मुलतान सुल्तान्स संघाचे मालक अली खान तरीन यांनी अनेक वेळा PSL व्यवस्थापनावर टीका केली आहे, ज्यात त्यांनी प्रकरणे हाताळण्यात वारंवार चुका केल्याचे म्हटले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 24, 2025 | 09:08 PM
PSL मालकाने कायदेशीर नोटीस फाडून दिले थेट उत्तर; ‘या’ वादाचं नेमकं कारण काय? (Photo Credit - X)

PSL मालकाने कायदेशीर नोटीस फाडून दिले थेट उत्तर; ‘या’ वादाचं नेमकं कारण काय? (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • पीसीबीच्या नोटीसचे तुकडे!
  • पीएसएल फ्रँचायझी मालकाचा सार्वजनिक विरोध
  • पाकिस्तान क्रिकेटमध्ये नेमका कोणता वाद पेटला?

PSL Owner Tears up Legal Notice: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधील प्रमुख फ्रँचायझी ‘मुल्तान सुल्तांस’ (Multan Sultans) यांच्यात मोठा वाद पेटला आहे. पीएसएल टीमचे मालक अली खान तरीन (Ali Khan Tareen) यांनी पीसीबीने पाठवलेली कायदेशीर नोटीस (Legal Notice) कॅमेऱ्यावर सार्वजनिकपणे फाडून बोर्डाची उघडपणे नाचक्की केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

वाद नेमका काय?

पीएसएलला लवकरच १० वर्षे पूर्ण होत आहेत आणि मुल्तान सुल्तांस टीमची मालकी डिसेंबरमध्ये संपुष्टात येणार आहे. त्यानंतर बोली लावून नवीन मालक निवडले जातील. अली खान तरीन यांनी यापूर्वी पीएसएल व्यवस्थापनावर टीका केली होती. या टीकेमुळे पीसीबीने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आणि बोली प्रक्रियेतून बॅन करण्याची धमकी दिली होती, तसेच व्हिडिओद्वारे माफी मागण्यास सांगितले होते.

The PSL Management has sent me a notice threatening to cancel Multan Sultans unless I offer them a public apology. Hazir Saeen. pic.twitter.com/yHWCcClXaD — Ali Khan Tareen (@aliktareen) October 23, 2025

IND VS PAK : “त्यांनी संघाला दहशतवाद्यांसारखे…” मोहसिन नक्वीचे कौतुक तर भारताविरुद्ध ओकले विष; ट्रॉफी वादावरचा Video Viral

तरीन यांचे सडेतोड उत्तर

अली खान तरीन यांनी आता त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत पीसीबीला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले की, व्यवस्थापनाने चुका सुधारण्याऐवजी त्यांना थेट कायदेशीर नोटीस पाठवली. त्यांनी पीसीबीच्या धोरणांवर जोरदार टीका करत त्यांच्या चुका उघड केल्या. व्हिडिओच्या शेवटी, त्यांनी कायदेशीर नोटीस फाडून टाकली आणि “मला आशा आहे की तुम्हाला माझ्या माफीचा हा व्हिडिओ आवडला असेल,” असे उपहासाने म्हटले. या कृतीतून त्यांना पीसीबीच्या नोटिसीची पर्वा नसल्याचे स्पष्ट होते.

चाहत्यांचा अली खान तरीन यांना पाठिंबा

अली खान तरीन यांनी पीसीबीवर प्रश्नचिन्ह उभे केल्यानंतर त्यांना चाहत्यांकडून भरभरून समर्थन मिळत आहे. अनेक चाहत्यांनी अली खान तरीन योग्य असल्याचे मत व्यक्त केले असून, पीसीबीच्या गुंडगिरीला असेच उत्तर मिळायला हवे, असे म्हटले आहे. एका चाहत्याने मोहसिन नक्वी (पीसीबीचे अध्यक्ष) यांच्यावर टीका करत, “मोहसिन नक्वी यांना त्यांच्या आसपास होय म्हणणारेच लोक हवे आहेत. आशा आहे की इतर टीम्ससुद्धा मुल्तान सुल्तांसच्या बाजूने उभ्या राहतील,” असे लिहिले.

IND VS PAK : मोहसिन नक्वी यांना अक्कल आली? ‘या’ दिवशी भारताला परत करणार Asian Cup Trophy; मोठ्या समारंभाचे आयोजन?

Web Title: Psl owner tears up legal notice and gives direct answer what is the real reason for this controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2025 | 09:07 PM

Topics:  

  • pakistan
  • PCB
  • PSL
  • Sports

संबंधित बातम्या

PAK vs SA : “नाचता येईना, अंगण वाकडे…”, पाकिस्तानच्या लागोपाठ पराभवानंतर शोएब अख्तर संतापला, दिला घरचा आहेर; पहा VIDEO
1

PAK vs SA : “नाचता येईना, अंगण वाकडे…”, पाकिस्तानच्या लागोपाठ पराभवानंतर शोएब अख्तर संतापला, दिला घरचा आहेर; पहा VIDEO

IND vs AUS 2nd ODI: रोहित शर्माला अॅडलेडमध्ये मिळाला खास ‘सन्मान’; संन्यासाच्या अटकळींना वेग
2

IND vs AUS 2nd ODI: रोहित शर्माला अॅडलेडमध्ये मिळाला खास ‘सन्मान’; संन्यासाच्या अटकळींना वेग

IND vs AUS 2nd ODI: गिल, कोहली ठरले फ्लाॅप; तर रोहित-अय्यरची अर्धशतकी झुंज! भारताचे ऑस्ट्रेलियासमोर २६५ धावांचे आव्हान
3

IND vs AUS 2nd ODI: गिल, कोहली ठरले फ्लाॅप; तर रोहित-अय्यरची अर्धशतकी झुंज! भारताचे ऑस्ट्रेलियासमोर २६५ धावांचे आव्हान

Rohit Sharma Record: रोहित शर्माने इतिहास रचला! दिग्गजांनाही न जमलेला पराक्रम ‘हिटमॅन’ने ऑस्ट्रेलियात करून दाखवला
4

Rohit Sharma Record: रोहित शर्माने इतिहास रचला! दिग्गजांनाही न जमलेला पराक्रम ‘हिटमॅन’ने ऑस्ट्रेलियात करून दाखवला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.