मोहसिन नक्वी(फोटो-सोशल मीडिया)
Asia Cup Trophy Controversy : आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवून विजेतेपद आपल्या नवे केले. असे असून देखील भारतीय संघाला अद्याप विजेतेपदाची ट्रॉफी मिळालेली नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांची इच्छा वैयक्तिकरित्या भारतीय संघाला ट्रॉफी सादर करण्याची आहे. परंतु, भारतीय संघाला हे मान्य नाही. म्हणूनच आशिया कप ट्रॉफीभोवतीचा वाद आता विकोपाला जाताना दिसत आहे, दरम्यान मोहसिन नक्वी भारतीय संघाला ट्रॉफी सादर करण्यासाठी एक समारंभ आयोजित करणार असल्याची बातमी समोर येत आहे. त्यांच्या या निर्णयाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
हेही वाचा : PAK vs SA: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ODI मालिकेसाठी पाकिस्तान संघ घोषित! ‘या’ खेळाडूंची लागली वर्णी
आशिया कप ट्रॉफीवरील वाद कमी होईल असे चित्र नाही. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ट्रॉफीबाबत एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याशी संपर्क साधला आहे. एका वृत्तानुसार, मोहसिन नक्वी यांनी कराची येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “एसीसीने बीसीसीआयला माहिती दिली आहे की १० नोव्हेंबर रोजी दुबईमध्ये भारताला ट्रॉफी सोपवण्यासाठी एक औपचारिक समारंभ आयोजित करण्यात येईल.” डॉनच्या वृत्तानुसार, मागील महिन्यात पाकिस्तान आणि भारत यांच्यातील अंतिम सामन्यानंतर झालेल्या गोंधळानंतर नक्वी वैयक्तिकरित्या ट्रॉफी सोपवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.
पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी कराची येथे माध्यमांशी बोलताना म्हटले की, “बीसीसीआयशी अनेक पत्रांची देवाणघेवाण झाली असून आशियाई क्रिकेट परिषदेकडून त्यांना कळवण्यात आले आहे की, १० नोव्हेंबर रोजी दुबईमध्ये एक समारंभ आयोजित करण्यात येऊ शकतो. त्यांनी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्यांच्या संघाला तसेच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी म्हणाले कि, “एसीसीने बीसीसीआयला लिहिले आहे की १० नोव्हेंबर रोजी दुबईमध्ये एक समारंभ आयोजित केला जाऊ शकतो. तुमचा कर्णधार आणि खेळाडू आणा आणि माझ्याकडून ट्रॉफी स्वीकारा.” दरम्यान, बीसीसीआय हा मुद्दा आयसीसी आणि एसीसीच्या बैठकीमध्ये उपस्थित करण्याचा विचारात आहे. आयसीसी बोर्डाची बैठक ४ ते ७ नोव्हेंबर दरम्यान दुबई येथे पार पडणार आहे.