टाटा कन्सल्टन्सीचा सलग चौथा विजय (0फोटो- सोशल मिडिया
साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संघाने २० षटकांत ८ बाद २२२ धावांचा डोंगर उभारला. संघाचा सलामीवीर विक्रांत बांगर याने अवघ्या ४४ चेंडूंत ९ चौकार आणि ५ षटकारांसह ८३ धावांची आक्रमक खेळी साकारली. त्याला विशाल पवार (४२ धावा, १५ चेंडू, ३ चौकार, ४ षटकार) आणि उदय गलांडे (नाबाद ४१ धावा, २२ चेंडू, २ चौकार, ३ षटकार) यांनी दमदार साथ दिली. शोएब मिर्झाने १९ धावांचे योगदान दिले. एआरएआय संघाकडून गोलंदाजीत निखिल मांडकेने ३७ धावांत ३, तर विकास साठेने ३६ धावांत २ बळी टिपले.
२२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एआरएआय संघाला २० षटकांत ३ बाद १०७ धावांपर्यंतच मजल मारता आली. कुणाल पी. याने ४० चेंडूंत ८ चौकार व एका षटकारासह ५० धावांची अर्धशतकी लढत दिली, तर प्रतीक शेलारने २४ धावा केल्या. मात्र वाढत्या धावगतीमुळे टीसीएसने हा सामना ११५ धावांच्या मोठ्या फरकाने खिशात घातला. टीसीएसकडून सुनील बाबरने ३८ धावांत २ गडी बाद केले. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या विक्रांत बांगरला ‘सामनावीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दुसऱ्या लढतीत सुधीर काळेच्या भेदक गोलंदाजीपुढे बार्कलेज संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. बार्कलेज संघाने २० षटकांत ९ बाद १०३ धावा केल्या. इर्शाद बेग (३३ धावा) आणि राहुल अगरवाल (२८ धावा) वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. केपीआयटीच्या सुधीर काळेने अवघ्या २० धावांत ५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला, तर आलोक नागराजने १४ धावांत १ बळी मिळवला.१०४ धावांचे माफक आव्हान केपीआयटी संघाने अवघ्या ९.२ षटकांत २ बाद १०९ धावा करत सहज पूर्ण केले. मंगेश पाटीलने केवळ २४ चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावांची वादळी खेळी करत संघाचा विजय सुकर केला. शुभम झापडेकरने २८ आणि आलोक नागराजने १२ धावांचे योगदान दिले. बार्कलेजकडून पियुष कांबळेने १४ धावांत १ गडी बाद केला. ५ बळी टिपणाऱ्या सुधीर काळेला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले.
Cricket News: पुण्यातील १९ वर्षांखालील क्रिकेटचा थरार! ‘या’ संघांची सेमीफायनलमध्ये शानदार धडक
Ans: ‘पुणे’ज कॉर्पोरेट क्लॅश क्रिकेट लीगमध्ये कुणालने ४० बॉलमध्ये 50 रन्सची खेळी केली.
Ans: ‘पुणे’ज कॉर्पोरेट क्लॅश क्रिकेट लीगमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने सलग चौथा विजय मिळवला आहे.






