Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: पुणे कॉर्पोरेट क्लॅशमध्ये TCS चा चौकार! सलग चौथ्या विजयासह स्पर्धेत दबदबा कायम

Cricket News: २२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एआरएआय संघाला २० षटकांत ३ बाद १०७ धावांपर्यंतच मजल मारता आली. कुणाल पी. याने ४० चेंडूंत ८ चौकार व एका षटकारासह ५० धावांची अर्धशतकी लढत दिली, तर प्रतीक शेलारने २४ धावा केल्या. 

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 04, 2026 | 06:44 PM
Pune Cricket Competition

Pune Cricket Competition

Follow Us
Follow Us:
  • टाटा कन्सल्टन्सीचा सलग चौथा विजय, केपीआयटीचीही बाजी
  • विक्रांत बांगरची वादळी खेळी, तर सुधीर काळेचा भेदक मारा
  • एआरएआय आणि बार्कलेज संघांना पराभवाचा धक्का
पुणे/ Cricket News: थेरगाव येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या ‘पुणे’ज कॉर्पोरेट क्लॅश क्रिकेट लीग २०२६’ स्पर्धेच्या साखळी फेरीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) संघाने आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवत सलग चौथ्या विजयाची नोंद केली. दुसऱ्या सामन्यात केपीआयटी संघाने बार्कलेज संघाचा ८ गडी राखून धुव्वा उडवत स्पर्धेतील आपला दुसरा विजय साकारला.

साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संघाने २० षटकांत ८ बाद २२२ धावांचा डोंगर उभारला. संघाचा सलामीवीर विक्रांत बांगर याने अवघ्या ४४ चेंडूंत ९ चौकार आणि ५ षटकारांसह ८३ धावांची आक्रमक खेळी साकारली. त्याला विशाल पवार (४२ धावा, १५ चेंडू, ३ चौकार, ४ षटकार) आणि उदय गलांडे (नाबाद ४१ धावा, २२ चेंडू, २ चौकार, ३ षटकार) यांनी दमदार साथ दिली. शोएब मिर्झाने १९ धावांचे योगदान दिले. एआरएआय संघाकडून गोलंदाजीत निखिल मांडकेने ३७ धावांत ३, तर विकास साठेने ३६ धावांत २ बळी टिपले.

IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत टीम इंडियाने जिंकले नाणेफेक; गोलंदाजीचा घेतला निर्णय

कुणालची वादळी खेळी

२२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एआरएआय संघाला २० षटकांत ३ बाद १०७ धावांपर्यंतच मजल मारता आली. कुणाल पी. याने ४० चेंडूंत ८ चौकार व एका षटकारासह ५० धावांची अर्धशतकी लढत दिली, तर प्रतीक शेलारने २४ धावा केल्या.  मात्र वाढत्या धावगतीमुळे टीसीएसने हा सामना ११५ धावांच्या मोठ्या फरकाने खिशात घातला. टीसीएसकडून सुनील बाबरने ३८ धावांत २ गडी बाद केले. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या विक्रांत बांगरला ‘सामनावीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सुधीर काळेची आक्रमक गोलंदाजी

दुसऱ्या लढतीत सुधीर काळेच्या भेदक गोलंदाजीपुढे बार्कलेज संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. बार्कलेज संघाने २० षटकांत ९ बाद १०३ धावा केल्या. इर्शाद बेग (३३ धावा) आणि राहुल अगरवाल (२८ धावा) वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. केपीआयटीच्या सुधीर काळेने अवघ्या २० धावांत ५ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला, तर आलोक नागराजने १४ धावांत १ बळी मिळवला.१०४ धावांचे माफक आव्हान केपीआयटी संघाने अवघ्या ९.२ षटकांत २ बाद १०९ धावा करत सहज पूर्ण केले. मंगेश पाटीलने केवळ २४ चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावांची वादळी खेळी करत संघाचा विजय सुकर केला. शुभम झापडेकरने २८ आणि आलोक नागराजने १२ धावांचे योगदान दिले. बार्कलेजकडून पियुष कांबळेने १४ धावांत १ गडी बाद केला. ५ बळी टिपणाऱ्या सुधीर काळेला ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले.

Cricket News: पुण्यातील १९ वर्षांखालील क्रिकेटचा थरार! ‘या’ संघांची सेमीफायनलमध्ये शानदार धडक

💡

Frequently Asked Questions

  • Que: ‘पुणे’ज कॉर्पोरेट क्लॅश क्रिकेट लीगमध्ये कुणालने किती रन्स केल्या?

    Ans: ‘पुणे’ज कॉर्पोरेट क्लॅश क्रिकेट लीगमध्ये कुणालने ४० बॉलमध्ये 50 रन्सची खेळी केली.

  • Que: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस संघाचा कितवा विजय आहे?

    Ans: ‘पुणे’ज कॉर्पोरेट क्लॅश क्रिकेट लीगमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने सलग चौथा विजय मिळवला आहे.

Web Title: Tcs wins fourth match in pune corporate clash cricket league pune sports news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 06:44 PM

Topics:  

  • cricket news

संबंधित बातम्या

IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत टीम इंडियाने जिंकले नाणेफेक; गोलंदाजीचा घेतला निर्णय
1

IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेत टीम इंडियाने जिंकले नाणेफेक; गोलंदाजीचा घेतला निर्णय

Cricket News: पुण्यातील १९ वर्षांखालील क्रिकेटचा थरार! ‘या’ संघांची सेमीफायनलमध्ये शानदार धडक
2

Cricket News: पुण्यातील १९ वर्षांखालील क्रिकेटचा थरार! ‘या’ संघांची सेमीफायनलमध्ये शानदार धडक

Cricket News: असिम मुजावरचा ‘पॉवर शो’! फॅन्टम क्रिकेट ॲकॅडमीने उंचावला मान्सून करंडक
3

Cricket News: असिम मुजावरचा ‘पॉवर शो’! फॅन्टम क्रिकेट ॲकॅडमीने उंचावला मान्सून करंडक

Cricket News: पुण्यात उद्यापासून क्रिकेटचा थरार; ‘या’ करंडकासाठी तब्बल 20 संघ भिडणार
4

Cricket News: पुण्यात उद्यापासून क्रिकेटचा थरार; ‘या’ करंडकासाठी तब्बल 20 संघ भिडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.