PBKS vs CSK: Will Dhoni's bat work? Punjab Kings vs CSK first match today, know A to Z information
PBKS vs CSK : आज क्रिकेटप्रेमींना आयपीएल 2025 दोन सामन्यांची पर्वणी असणार आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात रंगणार आहे, तर दुसरा सामना संध्याकाळी पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई आणि पंजाब आमनेसामने असणार आहे.
आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. संघ स्पर्धेतील आपला दूसरा विजय शोधत आहे. तर पंजाबने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत, संघ आपल्या घरच्या मैदानावर चेन्नईविरुद्ध जिंकण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. आजच्या या सामान्याची माहिती घेऊया.
हेही वाचा : English Premier League : फुलहॅमकडून लिव्हरपूलचा धुव्वा, २-३ असा केला पराभव
आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल सांगायचे झाले तर, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ३० सामने खेळवण्यात आले आहे. चेन्नई सुपर किंग्जने 16 सामने आपल्या नावे केले आहे, तर पंजाब किंग्जने 14 सामने जिंकले आहेत. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की यांच्यातील सामना अतिटटीचा होताना बघायला मिळतो. मागील झालेल्या 5 सामन्यांमध्ये पंजाब किंग्जने आपला दबदबा राखला आहे. पंजाबने गेल्या 5 पैकी 4 सामने आपल्या नावे केले आहे, तर चेन्नईने फक्त एकदाच विजय मिळवता आला आहे.
आतापर्यंत महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सहा आयपीएल सामने खेळवण्यात आले आहेत. येथे, लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने तीन वेळा सामना जिंकून दाखवला आहे. तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने तीन वेळा सामने आपल्या नावे केले आहेत. या स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना उसळी देणारी असून, जिथे सुरुवातीला विकेट घेणे अवघड असते. मग काही षटकांनंतर, फलंदाजाच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडायला सुरवात होते. दव देखील येथे महत्त्वाची भूमिका बजावत आला आहे.
हेही वाचा : KKR vs LSG : आज केकेआर-एलएसजी भिडणार! फिरकीपटू नारायण आणि राठी यांच्यात रंगणार वर्चस्व युद्ध
आज म्हणजेच मंगळवारी होणाऱ्या पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यामध्ये मुल्लानपूर येथे पावसाचा अंदाज नाही. येथे कमाल तापमान ४० अंश आणि किमान २२ अंश राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), जोश इंग्लिस, मार्कस स्टॉइनिस, प्रियांश आर्य, शशांक सिंग, प्रभसिमरन सिंग, नेहल वढेरा, युझवेंद्र चहल, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन.
चेन्नई सुपर किंग्स : रुतुराज गायकवाड (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, एमएस धोनी, सॅम कुरान, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, खलील अहमद, मथिशा पाथिराना, मुकेश चौधरी.