English Premier League : फुलहॅमकडून लिव्हरपूलचा धुव्वा, २-३ असा केला पराभव (फोटो-सोशल मीडिया)
मँचेस्टर : इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) फुटबॉलमध्ये जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या लिव्हरपूलला फुलहॅमविरुद्ध २-३ असा पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, टॉटेनहॅमविरुद्ध १-३ असा पराभव पत्करल्यानंतर साउथहॅम्प्टन इंग्लंडच्या अव्वल लीगमधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला. इतर सामन्यांमध्ये, ओल्ड ट्रॅफर्ड येथे मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटी गोलरहित बरोबरीत सुटले. तर चेल्सी आणि ब्रेंटफोर्ड यांनीही गोलरहित बरोबरीत सुटले.
हेही वाचा : MI Vs RCB: हेझलवूडच्या ‘त्या’ विकेटने आरसीबीला तारलं, मुंबईचा 12 धावांनी पराभव
लिव्हरपूलच्या पराभवामुळे संघाने दुसऱ्या स्थानावर असलेल्या आर्सेनलवर १४ गुणांची आघाडी वाढवण्याची आणि विक्रमी २० व्या ईपीएल जेतेपदाच्या जवळ जाण्याची संधी गमावली. लिव्हरपूल संघ ३१ सामन्यांत ७३ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या आर्सेनलचेही तेवढ्याच सामन्यांमध्ये ६२ गुण आहेत. साउथहॅम्प्टन ३१ सामन्यांतून फक्त १० गुणांसह २० संघांच्या गुणतालिकेत तळाशी आहे.
इंटर मियामीने टोरंटोला रोखले स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने मेजर लीग सॉकर (एमएलएस) मध्ये चार सामन्यांत तिसऱ्यांदा गोल केला. यामुळेच इंटर मियामीने टोरंटो एफसीला १-१ अशा बरोबरीत रोखले. इंटर मियामीमध्ये सामील झाल्यापासून मेस्सीचा हा सर्व स्पर्धांमध्ये ४० वा गोल आहे, जो फ्रँचायझीसाठी एक विक्रम आहे. पहिल्या हाफच्या इंज्युरी टाइममध्ये मेस्सीने गोल केला. मेस्सीच्या गोलच्या तीन मिनिटे आधी फेडेरिको बर्नार्डचीने टोरंटोला आघाडी मिळवून दिली होती. इंटर मियामी सहा सामन्यांतून १४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर कोलंबस १५ गुणांसह एका गुणाची आघाडीवर आहे. तथापि, कोलंबसने इंटर मियामीपेक्षा एक सामना जास्त खेळला आहे.
हेही वाचा : KKR vs LSG : आज केकेआर-एलएसजी भिडणार! फिरकीपटू नारायण आणि राठी यांच्यात रंगणार वर्चस्व युद्ध
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात काल वानखेडे स्टेडियमवर सामना खेळवण्यात आला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. आरसीबीने एमआयला त्यांच्या घरच्याच मैदानावर १२ धावांनी मात दिली. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २२१ धावांचा डोंगर उभारायला होता. प्रतिउत्तरात मुंबईने चांगला प्रतिकार करून देखील मुंईबला २०९ धावार्यंतच मजल मारता आली. आरसीबईकडून विराट कोहली(६७ धावा), कर्णधार रजत पटीदार(६४ धावा) तसेच जितेन शर्मा(४० धावा) यांनी शानदार कामगिरी केली. तर मुंबईकडून तिलक वर्मा(५६ धावा) हार्दिक पंड्या(४२ धावा) यांनी छानगली खेळी केली परंतु ते मुंबइला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरले. आरसीबईकडून कृनाल पंड्याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर यश दयाल आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.