Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

R Ashwin : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यास तयार नव्हता अश्विन? बीसीसीआयसमोर ठेवली अट

काल झालेल्या गाबा येथील कसोटीमध्ये सामना अनिर्णित राहिल्यानंतर अश्विनने पत्रकार परिषदेमध्ये येऊन निवृत्ती जाहीर केली. पण नुकताच एक रिपोर्ट समोर आला आहे ज्यामध्ये अश्विन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येण्यास तयार नसल्याचे बोलले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 19, 2024 | 10:28 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

रविचंद्रन अश्विनची क्रिकेटमधून निवृत्ती : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेदरम्यान आर अश्विनने अचानक निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. काल झालेल्या गाबा येथील कसोटीमध्ये सामना अनिर्णित राहिल्यानंतर अश्विनने पत्रकार परिषदेमध्ये येऊन निवृत्ती जाहीर केली. त्याने मालिका संपेपर्यंत थांबला नाही. बाकीच्या दोन सामन्यांमध्ये संधी मिळणार नसल्याचा संकेत अश्विनला मिळाला असावा, त्यामुळे तिसऱ्या कसोटीनंतरच त्याने हा निर्णय घेतला. पण नुकताच एक रिपोर्ट समोर आला आहे ज्यामध्ये अश्विन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येण्यास तयार नसल्याचे बोलले जात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ०-३ अशा पराभवानंतर अश्विनच्या मनात निवृत्तीचा विचार होता, त्यामुळे तो प्लेइंग इलेव्हनची हमी घेऊन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला होता.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी अश्विन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यास उत्सुक नव्हता. १०६ कसोटी सामन्यांमध्ये ५३७ विकेट्स घेऊन आपली कारकीर्द संपवणाऱ्या अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेपर्यंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे नव्हते आणि त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीनपैकी दोन सामने खेळण्याची निवड केली असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यानंतर हा धक्कादायक निर्णय घेण्यात आला.

BGT 2024 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज, टॉप-5 मध्ये 2 भारतीय बॉलरचा समावेश

रिपोर्टनुसार, न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत भारताचा ०-३ असा पराभव झाल्यानंतर अश्विनच्या मनात निवृत्तीचा विचार आल्याचे मानले जात आहे. अनुभवी ऑफस्पिनरने संघ व्यवस्थापनाला सांगितले होते की जोपर्यंत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळत नाही तोपर्यंत तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार नाही.

पर्थ कसोटीत वॉशिंग्टन सुंदरला खेळवण्याचा भारताचा निर्णय निर्णायक ठरला. रोहित शर्माच्या विनंतीनुसार ॲडलेडमधील पिंक बॉल कसोटीत अश्विनने पुनरागमन केले असले तरी या अनुभवी खेळाडूला त्या कसोटीत आपली छाप सोडता आली नाही, त्यामुळे तिसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजाला संधी मिळाली. गाबा येथील तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर रोहितने म्हटल्याप्रमाणे मेलबर्न आणि सिडनी येथे होणाऱ्या अंतिम सामन्यांसाठी संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे या मालिकेच्या मध्यावर अश्विनने निवृत्ती जाहीर केली.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चौथा सामना २६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या सामना २६-३० या दरम्यान खेळवला जाणार आहे. सध्या मालिकेमध्ये बरोबरी आहे. भारताच्या संघाने मालिकेच्या पहिल्या कसोटीमध्ये विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने भारताला पराभूत करून १-१ अशी बरोबरी केली होती. नुकत्याच झालेल्या तिसरा सामना अनिर्णयीत राहिला त्यामुळे अजूनही सामन्यांमध्ये १-१ अशी बरोबरी आहे.

दोन्ही संघासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी ही मालिका जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळे आता या मालिकेमध्ये कोण विजय मिळवणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Web Title: R ashwin not ready to tour australia condition placed before bcci

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 10:28 AM

Topics:  

  • cricket
  • IND VS AUS
  • R Ashwin

संबंधित बातम्या

Ind w vs Aus w: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर! हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा
1

Ind w vs Aus w: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर! हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
2

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ
3

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष
4

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.