राहुल-गिल जोडीची कमाल! (Photo Creditn- X)
IND vs WI 1st Test: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला कसोटी सामना गुरुवारपासून खेळला जात आहे. या सामन्यात भारताने आपले दोन्ही दिवस वर्चस्व कायम ठेवले असुन पहिल्या दिवशी गोलंदाजाने तर दुसऱ्या दिवशी फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. आता शुभमन गिल आणि केएल राहुलच्या जोडीने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. खर तर क्रिकेटमध्ये ६१ वर्षांनी हा ऐतिहासिक योगायोग दिसला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात ६१ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा अनुभव आला. केएल राहुलने शतक झळकावले, तर कर्णधार शुभमन गिलने अर्धशतक पूर्ण केले. तथापि, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजवर लक्षणीय आघाडी घेत टीम इंडियाने सामन्यावरील आपली पकड मजबूत केली.
Both Shubman Gill and KL Rahul didn’t add any runs after reaching their milestones #INDvWI pic.twitter.com/X1YWl3W1iy — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 3, 2025
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादमध्ये सुरू आहे. वेस्ट इंडिजचा पहिला डाव फक्त १६२ धावांवर संपला. प्रत्युत्तरादाखल, जेव्हा टीम इंडिया फलंदाजीसाठी आली तेव्हा यशस्वी जयस्वाल फक्त ३५ धावा करून लवकर बाद झाला. साई सुदर्शन देखील फक्त सात धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
सलामीवीर केएल राहुलने एक टोक धरले असताना, शुभमन गिलने त्याला पूर्ण साथ दिली. कर्णधार शुभमन गिल ५० धावांवर बाद झाला. गिलने या डावात १०० चेंडूंचा सामना केला. गिलने त्याच्या डावात ५ चौकार मारले. केएल राहुलबद्दल बोलायचे झाले तर, त्याने १९७ चेंडूंमध्ये १०० धावा पूर्ण केल्या. राहुलने १२ चौकार मारले. गेल्या ६१ वर्षात पहिल्यांदाच दोन भारतीय फलंदाज एकाच कसोटी डावात ५० आणि १०० धावांवर बाद झाले आहेत.
यापूर्वी, १९६४ मध्ये ही कामगिरी झाली होती. त्यावेळीही अशीच कामगिरी करण्यात आली होती. दिल्लीत इंग्लंडविरुद्ध एक कसोटी सामना खेळला जात होता. एमएल जयसिम्हा यांनी ५० धावा केल्या आणि बुधी कुंद्रन यांनी भारतासाठी १०० धावा केल्या. हा एक विचित्र योगायोग आहे, कदाचित कारण हा पराक्रम जवळजवळ ६१ वर्षांनंतर घडला आहे. जर गिल किंवा राहुल यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत आणखी एक धाव केली असती तर ही ऐतिहासिक कामगिरी अतुलनीय ठरली असती.