फोटो सौजन्य - KolkataKnightRiders सोशल मीडिया
First innings of Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals match : आयपीएल २०२५ चा सहावा सामना आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यामध्ये सुरू आहे. या सामन्यात कलकत्ता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात राजस्थान रॉयलच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करून 152 धावांचे लक्ष्य कोलकाता नाईट राइडर्ससमोर उभे केले आहे. यामध्ये टॉस झाल्यानंतर अजिंक्य रहाणे सांगितले की सुनील नारायणे हा त्याच्या तब्येतीमुळे आज संघाचा भाग नाही त्यामुळे मोईन अलीला संघात स्थान मिळाले आहे.
म्हणून अलीने त्याला दिलेल्या संधीचे सोने केले आणि संघासाठी दोन विकेट घेतले. मागील सामन्यामध्ये यशस्वी जयस्वाल फार मोठी कामगिरी करू शकला नाही या सामन्यात त्याने २९ धावांची खेळी खेळली तर संजू सॅमसन मागील सामन्यात अर्धशतकीय खेळी खेळून संघासाठी कमालीची फलंदाजी केली होती. पण तो या सामन्यात विशेष कामगिरी करू शकला नाही. राजस्थानचा कर्णधार रियान परागने २५ धावांची खेळी खेळली, तर नितेश राणा आणखी एकदा फेल ठरला.
A cracking finish to a 🔥 innings 🫡
1️⃣5️⃣2️⃣ is the magic number in Guwahati 👀🎯
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 26, 2025
वाशिंद हंसरंगा त्याला आज संघामध्ये स्थान मिळाले होते पण तो बॅटने विशेष कामगिरी करू शकला नाही. कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजाबद्दल बोलायचं झाले तर वरून चक्रवर्तीने संघासाठी आजचा सामन्यात दोन क्रिकेटची कमाई केली तर महिन्यांनी देखील दोन विकेट्स घेतले. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघात सामील झालेला वैभव अरोराने संघासाठी दोन विकेट्स घेतले.
Spinners casting their magic 🪄
First Varun Chakravarthy and then Moeen Ali 💜
Updates ▶ https://t.co/lGpYvw7zTj#TATAIPL | #RRvKKR | @KKRiders pic.twitter.com/EfWc2iLVIx
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2025
मागील सामनामध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे फलंदाज फार विशेष कामगिरी करू शकले नव्हते, यामध्ये फक्त कॅप्टन अजिंक्य रहाणे याने अर्धशतकीय खेळी खेळून संघासाठी कमालीची कामगिरी केली होती त्यामुळे आजच्या सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्स फलंदाज कशी कामगिरी करतात यावर क्रिकेटच्या चाहत्यांचे लक्ष असणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघासाठी सर्वाधिक धावा ध्रुव जुरेलने केल्या आहेत. तर जोफ्रा अर्चरने संघासाठी १६ महत्वाच्या केल्या.
स्पेन्सर जॉन्सन याने संघासाठी एक विकेट घेतला तर हर्षित राणाने संघाला दोन विकेट मिळवून दिले. कोलकाता नाईट रायडर्सच्या सर्व गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करून दाखवली आहे आता १५२ धावांचे लक्ष्य कसे गाठतील याकडे क्रिकेटच्या चाहत्यांचे लक्ष असणार आहे.