Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranji Trophy : कोटियन, भुटची भेदक गोलंदाजी; मुंबई-सौराष्ट्रसह अनेक संघांचे दणदणीत विजय

Ranji Trophy : रणजी ट्रॉफीत तनुष कोटियन आणि पार्थ भुट यांनी प्रत्येकी आठ विकेट्स घेतल्या. मुंबईने हरियाणाला 10 विकेट्सने, तर सौराष्ट्रने आसामला डाव आणि 12 धावांनी हरवले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 29, 2026 | 09:36 PM
Ranji Trophy : कोटियन, भुटची भेदक गोलंदाजी; मुंबई-सौराष्ट्रसह अनेक संघांचे दणदणीत विजय

Ranji Trophy : कोटियन, भुटची भेदक गोलंदाजी; मुंबई-सौराष्ट्रसह अनेक संघांचे दणदणीत विजय

Follow Us
Follow Us:
  • कोटियनची जादुई फिरकीसमोर हरियाणा ढेर
  • भुटच्या गोलंदाजीच्या जोरावर सौराष्ट्र विजयी
  • बंगाल, कर्नाटक आणि विदर्भाचीही आगेकूच
Ranji Trophy : रणजी ट्रॉफीच्या गुरुवारी (29 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यांच्या अखेरच्या दिवशी तनुष कोटियन आणि पार्थ भुट यांनी प्रत्येकी 8 विकेट्स घेत प्रतिस्पर्धी संघांना धक्के दिले. कोटियनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने हरियाणाचा १० विकेट्सने पराभव केला, तर भुटच्या प्रभावी कामगिरीमुळे सौराष्ट्रने आसामवर डाव आणि १२ धावांनी विजय मिळवला.

कोटियनची फिरकी, मुंबईचा दणदणीत विजय

मुंबईतील बीकेसी मैदानावर ऑफ-स्पिनर तनुष कोटियनने 81 धावांत 8 विकेट्स घेतल्या. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस हरियाणाच्या दुसऱ्या डावातील एक विकेट घेतल्यानंतर त्याने अखेरच्या दिवशी आणखी सात फलंदाजांना बाद केले. हिमांशू राणा (46) आणि निशांत सिंधू (44) यांच्यासह त्याने हरियाणाच्या फलंदाजीला खिंडार पाडले.

मुंबईसमोर विजयासाठी अवघ्या 97 धावांचे लक्ष्य होते. मुंबईने 11 षटकांपेक्षाही कमी वेळेत हे लक्ष्य गाठले. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या अंगकृष रघुवंशीने 39 चेंडूंत नाबाद 67 धावांची आक्रमक खेळी केली.

भुटची भेदक गोलंदाजी; सौराष्ट्रचा डावाने विजय

राजकोट येथील निरंजन शाह स्टेडियमवर सामनावीर पार्थ भुटने 18 षटकांत केवळ 17 धावा देत 8 विकेट्स घेतल्या. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस त्याने सहा विकेट्स मिळवल्या होत्या. त्यानंतर अखेरच्या दिवशीही त्याने आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवली. रवींद्र जडेजाने 2  विकेट्स घेत त्याला साथ दिली. त्यामुळे सौराष्ट्रने आसामवर डाव आणि 12 धावांनी विजय मिळवला.

भारताच्या आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहभागी होणाऱ्या जडेजाने 22 षटकांत 58 धावा देत दोन विकेट्स घेतल्या. त्याने चार षटके निर्धाव टाकली.

IND vs NZ : ऑकलंडमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस की गोलंदाजांचा हल्लाबोल? ईडन पार्कवर कोण मारणार बाजी? पाहा Pitch Report

बंगाल, कर्नाटक आणि विदर्भाचेही विजय

तिरुवनंतपुरम येथे बंगालने केरळचा 287 धावांनी पराभव केला. प्रदीप्त प्रमाणिकने 51 धावांत सहा विकेट्स घेत केरळचा डाव 120 धावांवर गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. म्हैसूर येथे कर्णधार श्रेयस गोपालच्या पाच विकेट्सच्या जोरावर कर्नाटकने त्रिपुराचा डाव आणि 116 धावांनी पराभव केला. त्रिपुराचा दुसरा डाव 180 धावांवर आटोपला.

नागपूर येथे विदर्भाने गोव्याला डाव आणि 27 धावांनी हरवले. हर्ष दुबेने 38 धावांत चार विकेट्स घेतल्या. गोव्याकडून मंथन खुटकरने सर्वाधिक 70 धावा केल्या; मात्र त्याची खेळी संघाला पराभवापासून वाचवू शकली नाही.

IND Vs NZ: उद्या नुसता राडा! केवळ 35 रन्स अन् Abhishek Sharma ‘हा’ महारेकॉर्ड करणार

गुजरातची मोठी धावसंख्या; अनेक सामने अनिर्णित

वडोदरा येथे गतविजेता जम्मू-काश्मीर आणि बडोदा यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. पुण्यात गुजरातने महाराष्ट्राविरुद्ध दुसरा डाव 5 बाद 446 धावांवर घोषित केला. आर्य देसाईने 151, जयमीत पटेलने नाबाद 119, तर उर्विल पटेलने 96 धावा केल्या. मात्र, हा सामना अनिर्णित राहिला.

सिकंदराबाद येथे पंजाब आणि हैदराबाद यांच्यातील सामना अखेरच्या दिवशी चहापानाच्या वेळी अनिर्णित घोषित करण्यात आला. प्रभसिमरन सिंहने 76 चेंडूंत 68 धावा केल्या, तर पंजाबचा कर्णधार उदय सहारनने 106 चेंडूंत नाबाद 55 धावा केल्या.

हिमाचल प्रदेश आणि चंदीगड यांच्यातील सामनाही मोठ्या धावसंख्येनंतर अनिर्णित राहिला. आकाश वशिष्ठने नाबाद 126 धावा केल्या. चंदीगडच्या 5 बाद 685 धावांच्या घोषित डावाला उत्तर देताना हिमाचल प्रदेशने 6 बाद 559 धावा केल्या.

कार्तिक यादवने 42 धावांत सहा विकेट्स घेतल्या; मात्र पुडुचेरीने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर उत्तर प्रदेशविरुद्धचा सामना अनिर्णित राखला.

Web Title: Ranji trophy tanush kotian parth bhut eight wickets mumbai saurashtra win rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 09:36 PM

Topics:  

  • Mumbai Team
  • ranji trophy
  • Ravindra Jadeja

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.