फोटो सौजन्य - BCCI
रवींद्र जडेजा : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सध्या तिसरा कसोटी सामना सुरु आहे. भारताच्या संघाने पहिले दोन सामने गमावल्यानंतर टीम इंडियाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कमबॅक दिशेने जाताना दिसत आहे. भारताच्या संघाची मागील दोन्ही सामन्यांमध्ये फलंदाजी खराब होती, पण भारताच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करून दाखवली. तिसऱ्या सामान्यांच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताचा फिरकीपटू रवींद्र जडेजा ५ विकेट्स घेतले होते आता त्याने दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा पाच विकेट्स मिळवले आहेत. त्याच्या या कामगिरीने सोशल मीडियावर त्याचे भरभरून कौतुक केले जात आहेत. आता त्याने नवा रेकॉर्ड नावावर केला आहे.
हेदेखील वाचा – IND VS NZ : फलंदाजी करताय की टाईमपास? टीम इंडियाने गमावले दुसऱ्या इनिंगमध्ये ५ विकेट
रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मुंबईत खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात न्यूझीलंडला १७४ धावांत गुंडाळले. जडेजाने दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या आणि यासह त्याने असे काही केले जे त्याने आजपर्यंतच्या कारकिर्दीत कधीही केले नव्हते. जडेजाने 2012 मध्ये कसोटी पदार्पण केले, परंतु या डावखुऱ्या फिरकीपटूने वानखडे स्टेडियमवर जे अनोखे काम केले आहे ते यापूर्वी कधीही झाले नव्हते. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य दिले आहे. टीम इंडियाने ही मालिका आधीच गमावली असून तिसऱ्या कसोटी सामन्यात तिची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. अशा परिस्थितीत जडेजाने टीम इंडियाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आता उरलेले काम फलंदाजांचे आहे.
Ravindra Jadeja wraps things up immediately on Day 3 👌👌#TeamIndia need 147 runs to win the Third Test 🙌
Live – https://t.co/KNIvTEyxU7#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/AOXrDaTmFP
— BCCI (@BCCI) November 3, 2024
या सामन्याच्या पहिल्या डावात आणि दुसऱ्या डावातही जडेजाने विकेट घेतली होती. या लेफ्ट आर्म स्पिनरने 22 षटकांत 65 धावा देत पाच बळी घेतले. दुसऱ्या डावात त्याने 13.5 षटकात 55 धावा देत पाच बळी घेतले. जडेजाने सामन्याच्या दोन्ही डावात प्रत्येकी पाच विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी जडेजाने एकाही सामन्याच्या दोन्ही डावात पाच बळी घेतले नव्हते. कसोटी सामन्यातील त्याची ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. जडेजाची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाली. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर झालेल्या सामन्यात जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 10 विकेट घेतल्या होत्या. जडेजाने पहिल्या डावात तीन तर दुसऱ्या डावात सात बळी घेतले.
यासह जडेजा न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत प्रत्येकी पाच बळी घेणारा दुसरा भारतीय फिरकी गोलंदाज ठरला आहे. त्यांच्या आधी रविचंद्रन अश्विनने हे काम केले होते. मुंबई कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अश्विनला एकही विकेट मिळाली नाही. दुसऱ्या डावात त्याने तीन विकेट घेतल्या.