फोटो सौजन्य – X (BCCI)
राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुचा वेगवान गोलंदाज यश दयाल याच्या अडचणीमध्ये वाढ होत चालली आहे. सध्या तो सोशल मिडीयावर चर्चेचा विषय आहे. अनेक वृतांच्या माहितीनुसार त्याच्यावर अनेक लैगिंक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. सोशल मिडीयावर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात यासंदर्भात टीका केली जात आहे. 2025 आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाने 18 वर्षानंतर आयपीएलची ट्रॉफी जिंकली. त्यानंतर चेंगराचेंगरी प्रकरणांमध्ये अनेक खेळाडू फसले होते.
या प्रकरणानंतर आरसीबीचा वेगवान गोलंदाज यश दयालयाच्या संदर्भात अनेक त्याच्या वैयक्तिक जीवनाच्या बाबतीत बातम्या समोर येत आहेत. यूपी प्रीमियर लीग काही महिन्यात सुरु होणार आहे. या स्पर्धेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आयपीएलमध्ये आरसीबीच्या संघाकडून खेळणारा डावखुरा वेगवान गोलंदाज यश तयार यावर्षी युपी t20 लीग खेळताना दिसणार नाही. यूपी t20 लीग मध्ये यश दयालवर आता बंदी घालण्यात आली आहे.
🚨 No Yash Dayal in UP T20 🚨
Yash Dayal has been banned from the UP T20 after a police case was registered against him.
He was purchased by the Gorakhpur Lions for ₹7 lakh. [Dainik Jagran]
📷 BCCI pic.twitter.com/196449lQYi
— CricketGully (@thecricketgully) August 11, 2025
यश दयाल विरुद्ध अनेक आरोप लावण्यात आले आहेत. आरसीबीच्या वेगवान गोलंदाज विरुद्ध जयपुर मधील सांगानेर सदर पोलीस स्टेशन मध्ये 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या खेळाडूच्या विरोधात एफ आय आर देखील दाखल करण्यात आले आहे त्यामुळे यूपी क्रिकेट असोसिएशन ने हा निर्णय घेतला आहे. मे महिन्यामध्ये यश दयाने आरसीबी संघासह आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून बरेच महिने दूर आहे.
वृत्तांचा माहितीनुसार गोरखपूर लायन्सने यश दयाल याला सात लाख रुपयांना खरेदी केले होते. यूपी t20 लीग 2025 मध्ये चल आता सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. यूपीच्या सूत्रांच्या अहवालानुसार यश दयाल वर दाखल झालेल्या खटल्यामुळे त्याला लीगमधून बॅन करण्यात आले आहे.
गाजियाबादमध्ये एका महिलेने यश दयालविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. यश दयाल यांनी लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे लैंगिक शोषण केल्याचे सांगण्यात आले होते. ही तक्रार २१ जून रोजी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या तक्रार पोर्टलवर दाखल करण्यात आली होती, त्यानंतर औपचारिक एफआयआर नोंदवण्यात आला होता. तथापि, अलाहाबाद उच्च न्यायालयाने (उच्च न्यायालय) यश दयाल यांच्या अटकेला स्थगिती दिली होती.