फोटो सौजन्य – X
यश दयालवर लैंगिक शोषणाचा आरोप : राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने 18 वर्षानंतर आयपीएल 2025 मध्ये त्याच्या नशिबी आनंद लागला होता. पण त्यानंतर सातत्याने आरसीबीचे खेळाडू त्याचबरोबर मालक, मॅनेजर यांच्या अडचणीमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. आरसीबीच्या मॅनेजरला देखील अटक करण्यात आली होती झालेल्या सेलिब्रेशनच्या प्रकरणामध्ये. आता आरसीबीचा वेगवान गोलंदाज यश दयाल या मागिल बरेच दिवस चर्चेत आहे.
गाझियाबादमधील एका महिलेने उत्तर प्रदेश आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा वेगवान गोलंदाज यश दयाळवर खूप गंभीर आरोप केले आहेत. हा सामान्य आरोप नाही, तर भावनिक फसवणूक, मानसिक छळ, लैंगिक शोषण आणि लग्नाचे खोटे आश्वासन असे आरोप आहेत, जे आता कायद्याच्या कक्षेत आहेत. गाझियाबादच्या इंदिरापुरम पोलिस स्टेशन परिसरात एका मुलीच्या तक्रारीवरून एफआयआर देखील नोंदवण्यात आला आहे.
IND vs ENG : आयपीएलचा स्टार वैभव सूर्यवंशीच्या एकदिवसीय मालिकेतील कामगिरीवर टाका नजर! शतक, अर्धशतक…
गाझियाबादची रहिवासी असलेली पीडित महिला दावा करते की ती गेल्या पाच वर्षांपासून यश दयालसोबत रिलेशनशिपमध्ये होती. या पाच वर्षांत तिने केवळ यश दयाळवरच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुटुंबावर विश्वास ठेवला होता कारण यशने तिची त्याच्या कुटुंबाशी ओळख करून दिली आणि कुटुंबानेही तिला ‘सून’ म्हणून स्वीकारले. हे सर्व स्वप्नासारखे वाटत होते, पण कदाचित ते स्वप्न नव्हते तर खोटे वचन होते.
एफआयआरनुसार, “त्या माणसाने मला भावनिक, मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. लग्नाचे खोटे आश्वासन देऊन त्याने वर्षानुवर्षे माझ्याशी नातेसंबंध टिकवून ठेवले आणि नवऱ्यासारखे वागले, ज्यामुळे माझा त्याच्यावर विश्वास आणखी दृढ झाला.” महिलेला हे सर्व खोटे आश्वासन असल्याचे लक्षात आले आणि तिने निषेध केला आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला शारीरिक हिंसाचार आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागले असेही अज्ञात महिलेने सांगितले आहे.
पीडितेने यशवर गंभीर आरोप केले आहेत आणि दावा केला आहे की क्रिकेटपटूचे इतर अनेक महिलांशीही संबंध आहेत. तरुणीचे म्हणणे आहे की तिच्याकडे यशविरुद्ध पुरेसे डिजिटल पुरावे आहेत, ज्यामध्ये चॅट्स, स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग समाविष्ट आहे. पीडितेचे असेही म्हणणे आहे की हे पुरावे तिचे आरोप पूर्णपणे सिद्ध करू शकतात आणि तपासात निर्णायक भूमिका बजावू शकतात.