फोटो सौजन्य – X
वैभव सूर्यवंशीची एकदिवसीय मालिकेतील कामगिरी : भारत विरुद्ध इंग्लंड U19 संघाची काल म्हणजेच 7 जुलै रोजी एकदिवसीय मालिका संपली आहे. या मालिकेमध्ये भारताच्या संघाने तीन सामने जिंकले तर इंग्लंडच्या संघाने दोन सामने जिंकले. भारताच्या संघाने ही मालिका 3–2 अशी मालिका जिंकली आहे आणि भारताची संघाने या मालिकेमध्ये विजय मिळवला आहे. भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे या मालिकेमध्ये फेल ठरला. तो मालिकेच्या एकही सामन्यात मोठी कामगिरी करू शकला नाही.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वात युवा खेळाडू म्हणून सामील झालेला वैभव सूर्यवंशी आणि या मालिकेमध्ये कमालीची कामगिरी केली. वैभव सूर्यवंशी याने या मालिकेमध्ये एक शतक झळकावले त्याचबरोबर एक अर्धशतक देखील झळकावले होते. या मालिकेमध्ये त्याची पाचही सामन्यांमध्ये कशी कामगिरी राहिली या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.
टीम इंडीयाचा पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशी याने भारतीय संघासाठी 48 धावांची खेळी खेळली होती. त्याने ही खेळी फक्त 19 चेंडुमध्ये केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यांमध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने 45 धावांची केळी खेळली होती या त्याने 34 चेंडूमध्ये पूर्ण केल्या होत्या. झालेल्या मालिकेच्या तिसऱ्या सामन्यामध्ये भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात वैभव सूर्यवंशी याने फक्त 31 चेंडूंमध्ये 86 धावा केल्या होत्या, ही त्याची पहिल्या मालिकेतील सर्वात मोठी खेळी खेळली होती.
𝗦 𝗶𝗻 𝗦𝘂𝗿𝘆𝗮𝘃𝗮𝗻𝘀𝗵𝗶 𝘀𝘁𝗮𝗻𝗱𝘀 𝗳𝗼𝗿 𝗦𝘁𝗮𝗿𝗯𝗼𝘆 ⭐
The IPL 2025 breakout star, Vaibhav Suryavanshi, is now lighting up the U19 Youth ODI series in England too! ⚡ #ENGvsIND #VaibhavSuryavanshi pic.twitter.com/qyaLdl9Z1R
— OneCricket (@OneCricketApp) July 6, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताच्या संघासाठी कहर केला होता. टीम इंडियाने 9 विकेट्स गमावून 363 धावा केल्या होत्या. यामध्ये भारताचा युवा खेळाडू सूर्यवंशी यांनी शतक झळकावले होते, त्याने 78 जनवरी 143 धावा केला होत्या. यामध्ये 10 षटकारांचा समावेश होता तर 13 चौकारांचा समावेश होता त्याने 183 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली होती.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात त्याने 33 धावांची खेळी खेळली या सामन्यांमध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताचा युवा संघ पुढील मालिका ही कसोटी मालिका खेळणार आहे. भारताचा संघ 2 सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. 12 जुलै पासुन भारताचा संघ हा कसोटी मालिकेला सुरुवात करणार आहे. या मालिकेमध्ये दोन सामने खेळवले जाणार आहेत.
दुसरा सामना हा 20 जुलैपासुन खेळवला जाणार आहे, मालिका झाली आहे त्यानंतर भारताचा संघ हा फस्ट क्लास क्रिकेट खेळताना दिसणार आहे. 12 जुलै ते 15 जुलै यादरम्यान खेळणार आहे, दुसरा सामना 20 जुलै ते 23 जुलै यादरम्यान आयोजित करण्यात आला आहे.