फोटो सौजन्य – X (Proteas Men)
South Africa vs Zimbabwe 2nd Test match report: दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेलवली जात आहे. या पहिल्या कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या सामन्यांमध्ये विजय मिळवून १–० अशा आघाडी आधीच घेतली आहे. पहिल्या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे संघाचे नेतृत्व हे केशव महाराज यांनी केले होते. पण त्यानंतर तो जखमी झाल्यामुळे त्याला दुसरा सामन्यातून बाहेर व्हावे लागले. दुसऱ्या सामन्यांमध्ये त्याने कर्णधारपद हे विहान मूल्डर त्याच्याकडे सोपवले आहे. त्याने या सामन्यांमध्ये अविश्वसनीय कामगिरी करून संपूर्ण जगाला चकित केले आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये आत्तापर्यंत दोन दिवस पार पडले आहे या दोन दिवसांमध्ये कामगिरी दोन्ही संघांची कशी राहिली या संदर्भात जाणून घ्या. विआन मुल्डरच्या स्फोटक खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ५ विकेट गमावून ६२६ धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वे पहिल्या डावात १७० धावांवर सर्वबाद झाला.
फॉलोऑनमुळे त्यांना पुन्हा फलंदाजी करावी लागली. सध्या झिम्बाब्वेने १ विकेट गमावून ५१ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडे ४०५ धावांची आघाडी आहे. झिम्बाब्वेसाठी परिस्थिती कठीण झाली आहे आणि त्यांना पुढे जाण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो, तर दक्षिण आफ्रिकेचे ध्येय विरोधी संघाला लवकरात लवकर रोखणे आणि डावाच्या आघाडीने जिंकणे हे असेल.
𝐑𝐄𝐂𝐎𝐑𝐃 𝐁𝐑𝐄𝐀𝐊𝐄𝐑 🤩
Wiaan Mulder enters the history books with a stunning 367* against Zimbabwe 👏#ZIMvSA | ✍️: https://t.co/EvFis53jyH pic.twitter.com/uSpsmGXlFO
— ICC (@ICC) July 7, 2025
ब्रायन लाराने एप्रिल २००४ मध्ये इंग्लंडविरुद्ध शानदार फलंदाजी केली आणि नाबाद ४०० धावा केल्या. गेल्या २१ वर्षांतील कसोटी डावातील सर्वाधिक धावसंख्येचा हा विक्रम आहे. जर विआन मुल्डरने झिम्बाब्वेविरुद्ध आणखी ३३ धावा केल्या असत्या तर त्याने ब्रायनचा २१ वर्षांचा जुना विक्रम मोडून इतिहास रचला असता. आता विआनने इतिहास न रचण्याचे कारण सांगितले आहे.
सामन्यानंतरच्या मुलाखतीत वियान म्हणाला, ‘माझ्या नशिबात काय लिहिले आहे हे कोणालाही माहिती नाही पण ब्रायन लाराने तो विक्रम आपल्या नावावर ठेवावा. मला वाटते की आपण दुसऱ्या चेंडूवर पुरेसे धावा केल्या होत्या. दुसरी गोष्ट म्हणजे ब्रायन लारा हा एक दिग्गज आहे. त्याने इंग्लंडसारख्या मोठ्या संघाविरुद्ध ४०० धावा केल्या, ज्यामुळे हा विक्रम खास बनतो. मला पुन्हा संधी मिळाली तरी मी तेच करेन. मी शुक्री कॉनराड (दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक) यांच्याशी बोललो आणि त्यांनी सांगितले की दिग्गजाला मोठे धावा करू द्या.’