Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BCCI Secretary : बीसीसीआय सचिवपदाची जबाबदारी ‘या’ क्रिकेटवर; अध्यक्षांनी केली तत्काळ नियुक्ती

BCCI Secretary : जय शाह यांनी BCCI सचिवपद सोडल्यानंतर १ डिसेंबरपासून ICC अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. आता अध्यक्षांनी सचिवपदाची जबाबदारी या क्रिकेटरवर टाकली आहे. जाणून घ्या सविस्तर रिपोर्ट

  • By युवराज भगत
Updated On: Dec 09, 2024 | 08:01 PM
Replacement of Jay Shah BCCI President Roger Binny has appointed Devjit Saikia as the Acting Secretary of the BCCI

Replacement of Jay Shah BCCI President Roger Binny has appointed Devjit Saikia as the Acting Secretary of the BCCI

Follow Us
Close
Follow Us:

BCCI Secretary Devajit Saikia : BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी देवजित सैकिया यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे कार्यकारी सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी 1 डिसेंबरपासून आयसीसीचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेल्या जय शाह यांची जागा घेतली आहे. जोपर्यंत सचिवपदावर कोणाची कायमस्वरूपी नियुक्ती होत नाही तोपर्यंत सैकिया हे अंतरिम सचिवपदावर राहतील. आम्ही तुम्हाला सांगतो की जय शाह 2019 पासून बीसीसीआयचे सचिवपद भूषवत होते, परंतु आता बिन्नीने त्यांच्या घटनात्मक अधिकारांचा वापर करून हे पद देवजीत सैकिया यांच्याकडे सोपवले आहे.

बीसीसीआयच्या सचिवपदी नवनियुक्ती

🚨 Devajit Saikia has been appointed as #BCCI acting secretary by Roger Binny

Details ➡️ https://t.co/wmfhNwiSa7#CricketTwitter pic.twitter.com/f0fxpNsP0L

— Cricbuzz (@cricbuzz) December 9, 2024

 

बीसीसीआयच्या सचिवपदी नवनियुक्ती

रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआयच्या सचिवपदी देवजित सैकिया यांची नियुक्ती करीत घोषणा केली की, “परिस्थिती पाहता आणि बीसीसीआयच्या नियमानुसार, या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती होईपर्यंत मी सचिवपदाचा कार्यभार तुमच्याकडे सोपवत आहे. मला विश्वास आहे की तुम्ही काम कराल. तुमच्या क्षमतेने आणि अभिमानाने या पदाची जबाबदारी तुम्ही उत्तम  तऱ्हेने पार पाडाल.” सैकिया हे पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत कार्यकारी सचिव पदावर राहतील. तुम्हाला सांगतो की बीसीसीआयला सचिवपद रिक्त झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत नवीन नियुक्ती करावी लागणार आहे, त्यामुळे सध्या देवजीत सैकिया यांना कार्यवाहक सचिव बनवण्यात आले आहे.

कोण आहे देवजीत सैकिया?
देवजीत सैकिया हे भारतातील प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आहेत आणि त्यांना क्रिकेट प्रशासनाचाही अनुभव आहे. तो आसाममधून आला असून त्याने रणजी ट्रॉफीमध्येही आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे. सैकिया त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत यष्टिरक्षक आणि मधल्या फळीतील फलंदाजाची भूमिका बजावत असे. ते 2022 पासून बीसीसीआयचे सहसचिव आहेत आणि जय शाह यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोठी कामे करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. याशिवाय सैकिया मे २०२३ पासून गुवाहाटी स्पोर्ट्स असोसिएशनचे (GSA) सरचिटणीसपद सांभाळत आहेत. त्याने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत आसामसाठी फक्त 4 सामने खेळले ज्यात त्याने 53 धावा केल्या. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत त्याने 8 झेल घेतले आणि एका फलंदाजाला यष्टिचित केले.

नुकतेच जय शाह यांची झाली होती ICC च्या अध्यक्षपदी नियुक्ती

भारतीय नियामक मंडळाचे (BCCI) चे सचिव जय शाह यांची आता आयसीसीचे अध्यक्ष म्हणून निवडणून आले आहेत. त्यामुळे आता बीसीसीआयमध्ये त्याचे पद सध्या रिक्त आहे. २९ सप्टेंबर रोजी रविवारी बंगळुरूमध्ये बीसीसीआयची बैठक पार पडली. यामध्ये ९३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) उपस्थित असलेल्या बीसीसीआयच्या सदस्यांनी विद्यमान सचिव जय शाह यांना संक्रमण शक्य तितके सुरळीत करण्यासाठी आपला उत्तराधिकारी शोधण्याची प्रक्रिया जलद करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे आता बीसीसीआयच्या सचिवपदी म्हणजेच जय शाह यांची जागा घेणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शाह आपल्या पदावरून पायउतार होऊ शकतो असा अंदाज लावला जात आहे कारण जय शाह हे १ डिसेंबरपासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्षपद सांभाळणार आहेत. नवीन सचिवाची निवड एजीएमच्या अजेंड्यावर नव्हती. ही प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी उपस्थित सदस्यांनी आपापसात उत्तराधिकार योजनेवर चर्चा केल्याचे कळते.

Web Title: Replacement of jay shah bcci president roger binny has appointed devjit saikia as the acting secretary of the bcci

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 08:01 PM

Topics:  

  • bcci
  • cricket
  • ICC
  • Jay shah

संबंधित बातम्या

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण
1

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण

BPL मध्ये मॅच फिक्सिंग! तपासात बांग्लादेशी क्रिकेटपटूंच्या काळ्या कारनाम्यांचा केला खुलासा
2

BPL मध्ये मॅच फिक्सिंग! तपासात बांग्लादेशी क्रिकेटपटूंच्या काळ्या कारनाम्यांचा केला खुलासा

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
3

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

Sandeep Patil Birthday : १९८३ च्या विश्वचषकातील हिरो संदीप पाटीलांचा आज वाढदिवस; BCCI कडून देण्यात आल्या खास शुभेच्छा
4

Sandeep Patil Birthday : १९८३ च्या विश्वचषकातील हिरो संदीप पाटीलांचा आज वाढदिवस; BCCI कडून देण्यात आल्या खास शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.