फोटो सौजन्य – Instagram (wimbledon)
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये तिसरा कसोटी ला सुरू व्हायला दोन दिवस शिल्लक आहेत. 10 जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये मालिकेचा तिसरा सामना खेळवला जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यांबद्दल सांगायचं झाले तर दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाची फलंदाजी कौतुकास्पद राहिली तर दुसऱ्या सामन्यांमध्ये भारताचा संघाने गोलंदाजी देखील सुधारली. दुसऱ्या सामनात विजय मिळवल्यानंतर भारताच्या संघाने मालिकेमध्ये एक एक अशी बरोबरी केली आहे.
भारताचा उपकर्णधार रिषभ पंत याचा फोटो सोशल मीडियावर आता वायरल होत आहे. सामन्याला दोन दिवस शिल्लक असताना ऋषभ पंत हा विम्बल्डनला पोहोचला आहे. 7 जुलै रोजी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा विम्बल्डनला सामना नोवाक जोकोविच याचा पाहण्यासाठी पोहोचला होता. तो त्याच्या पत्नीसोबत तेथे पाहायला मिळाला आणि सोशल मीडियावर सुद्धा त्याचे मोठ्या प्रमाणात फोटो व्हायरल होत आहे.
Virat Kohli – Anushka Sharma च्या लंडनमधील घरचा पत्ता लागला हाती! इंग्लिश खेळाडूने उघड केले रहस्य
आता भारताचा उपकर्णधार ऋषभ पंत हा देखील सामना पाहण्यासाठी विम्बल्डनला पोहोचला आहे. विम्बल्डनच्या इंस्टाग्राम पेजवर रिषभ पंतचे फोटो शेअर केले आहेत. यावर त्यांनी कॅप्शन लिहिले आहे की इंडियन टेस्ट उपकर्णधार रिषभ पंतचा दिवस. या पोस्ट कार्याने त्याच्या चाहत्यांच्या कमेंट्स येत आहेत.
ऋषभ पंत याच्या आधी विम्बल्डनमध्ये अनेक भारताच्या दिग्गज खेळाडूंना आमंत्रित केले होते. यामध्ये सचिन तेंडुलकर, एम एस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. या यादीमध्ये आत्ता रिषभ पंतचे नाव देखील सामील झाले आहे.
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेमध्ये अजुनपर्यत तीन सामने शिल्लक आहेत. तिसरा सामना हा 10 जुलैपासुन खेळवला जाणार आहे. मालिकेमध्ये बरोबरी झाली आहे, आता भारताच्या संघाला मालिकेमध्ये आघाडी घेण्याची संधी आहे. मागील दोन सामन्यांमध्ये ऋषभ पंच कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही डावांमध्ये ऋषभ पंत याने दोन शतके झळकावली होती.
दुसऱ्या सामन्यामध्ये तो पहिला डावात स्वस्तात बाद झाला होता पण तिसऱ्या डावांमध्ये त्याने कमालीचा खेळ दाखवला होता आणि संघासाठी मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाचे योगदान दिले होते. पहिला डावामध्ये ऋषभ पण त्याने 134 धावा केल्या होत्या, तर दुसरा डावामध्ये त्याने 118 धावांची खेळी खेळली होती. दुसरा सामन्यांमध्ये त्यांना पहिला डावामध्ये 25 धावा केल्या होत्या, तर तिसरा डावा डावामध्ये 65 धावांची खेळी खेळली होती.