Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rising Stars Asia Cup 2026 साठी भारताचा संघ जाहीर; तिलक वर्माकडे कर्णधारपद; युवा ब्रिगेड उतरणार मैदानात

BCCI Announces India A Squad for Rising Stars Asia Cup 2026: रायझिंग एशिया कप २०२६ साठी भारतीय 'अ' संघाची घोषणा करण्यात आली आहे. तिलक वर्माला या संगाचे कर्णधारपद देण्यात आले असून, वैभव सूर्यवंशीचीही निवड झाली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 02, 2026 | 07:26 PM
BCCI Announces India A Squad for Rising Asia cup

BCCI Announces India A Squad for Rising Asia cup

Follow Us
Follow Us:
  • रायझिंग एशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर
  • तिलक वर्माकडे संघाचे कर्णधापदर
  • वैभव सूर्यवंशीलाही मोठी संधी
Rising Stars Asia Cup 2026: बीसीसीआयच्या निवड समितीने आशियाई क्रिकेट परिषद (ACC) पुरुष रायझिंग स्टार आशिया कप २०२६ साठी भारत ‘अ’ संघाची घोषणा केली आहे. ही आगामी स्पर्धा यावर्षी १९ ते २९ नोव्हेंबर दरम्यान कतारमधील दोहा येथे होणार आहे. ही स्पर्धा देशातील अनेक युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची एक महत्त्वपूर्ण संधी देईल. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने युवा आणि अनुभवी फलंदाज तिलक वर्माला भारताचे कर्णधारपद सोपवले आले आहे. तर, रजत पाटीदारला उपकर्णधार म्हणून घोषित केले आहे.

IND A vs NZ A: किवींची दांडी गुल! सिराज-मुकेशची जोडी ठरली घातक; भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज ढेर

वैभव सूर्यवंशीला मिळाले संघात स्थान

इंडिया ‘अ’ च्या फलंदाजी विभागात अनुभव आणि युवा खेळाडूंचा समावेश आहे. या संघात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा समावेश आहे. वैभवने अलीकडेच आपल्या स्फोटक फलंदाजीने लक्ष वेधून घेतले आहे. परंतु, न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत वैभवला केवळ दोन सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. संघाच्या आघाडीच्या फळीत अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांच्यासारखे स्फोटक फलंदाज आहेत. आपल्या आक्रमक फलंदाजीने सुरुवातीच्या षटकांमध्येच प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकण्याची क्षमता या दोघांमध्ये आहे.

दरम्यान, मधली फळी मजबूत करण्यासाठी प्रभसिमरन सिंग, कुमार कुशाग्र आणि रिंकू सिंग यांसारख्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. सूर्यांश शेडगेचाही संघात समावेश आहे. विशेषतः रिंकू सिंगकडून शेवटच्या षटकांमध्ये जलद धावा करून संघाला कठीण परिस्थितीत एक मोठी धावसंख्या उभारण्यास मदत करण्याची अपेक्षा असेल.

अष्टपैलू खेळाडूंमुळे संघ अधिक मजबूत

संघाचे अष्टपैलू खेळाडूंचे पर्यायही मजबूत दिसत आहेत. निवड समितीने शाहबाज अहमद, विप्राज निगम, हर्ष दुबे आणि तनुष कोटियन यांचा समावेश केला आहे. हे खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये योगदान देऊ शकतात. यामुळे कर्णधार तिलक वर्मा यांना अंतिम ११ खेळाडूंमध्ये संतुलन साधण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होतील. या अष्टपैलू खेळाडूंची फिरकी गोलंदाजी कतारच्या परिस्थितीतही उपयुक्त ठरू शकते.

हर्षित राणा वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळेल

वेगवान गोलंदाजी विभागात हर्षित राणा हे सर्वात प्रमुख नाव आहे. तो आपल्या वेग आणि आक्रमक गोलंदाजीने संघाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल. प्रिन्स यादव आणि अर्शद खान यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघ ‘ब’ गटात

स्पर्धेच्या स्वरूपानुसार, भारत ‘अ’ संघाला गट ‘ब’ मध्ये ठेवण्यात आले आहे. या गटात भारत, संयुक्त अरब अमिरात (UAE), नेपाळ आणि पाकिस्तान ‘अ’ यांचा समावेश आहे. गट ‘अ’ मध्ये बांग्लादेश ‘अ’, श्रीलंका ‘अ’, अफगाणिस्तान ‘अ’ आणि हाँगकाँग यांचा समावेश असेल.

भारत ‘अ’ संघ

अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, कुमार कुशाग्रा, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विपराज निगम, हर्ष दुबे, तनुष कोटियन, हर्षित राणा, प्रिन्स यादव, अर्शद खान.

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडेसाठी गिल-गंभीर यांची कसोटी! सिराजला डच्चू, अर्शदीपला संधी? पाहा संभाव्य Playing 11

Web Title: Rising stars asia cup 2026 india a squad tilak varma captain vaibhav suryavanshi pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 07:26 PM

Topics:  

  • IND VS PAK
  • Rajat Patidar
  • Tilak Varma

संबंधित बातम्या

IND Vs PAK: घोर निराशा! ‘या’ टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानकडून भारताचा पराभव, केवळ 23 बॉलमध्येच…
1

IND Vs PAK: घोर निराशा! ‘या’ टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानकडून भारताचा पराभव, केवळ 23 बॉलमध्येच…

पाकड्यांना रडवायला Team India सज्ज; 10 दिवसांत दोन वेळा भिडणार; पहा संपूर्ण वेळापत्रक
2

पाकड्यांना रडवायला Team India सज्ज; 10 दिवसांत दोन वेळा भिडणार; पहा संपूर्ण वेळापत्रक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.