Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs PAK: घोर निराशा! ‘या’ टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानकडून भारताचा पराभव, केवळ 23 बॉलमध्येच…

IND Vs PAK: आज हाँगकाँग सिक्सेस टूर्नामेंटमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात महत्वाचा सामना पार पडला. हा सामना प्रत्येकी 6-6 ओव्हरचे खेळवण्यात आला. या रोमांचक सामन्यात भारताने पाकिस्तानला विजयासाठी 89 रन्सचे टार्गेट दिले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 30, 2026 | 02:16 PM
Hong Kong Sixes Tournament

Hong Kong Sixes Tournament

Follow Us
Follow Us:
  • हाँगकाँग सिक्सेसमध्ये पाकिस्तानकडून भारताचा पराभव
  • प्रत्येकी 6-6 ओव्हर्सचा खेळवला गेला सामना 
  • 23 बॉलमध्ये पाकिस्तानकडून टार्गेट पूर्ण 
IND Vs PAK: आज हाँगकाँग सिक्सेस टूर्नामेंटमध्ये भारत आणि पाकिस्ता आमनेसामने आले. दोन्ही आज क्रिकेटच्या सामन्यात खेळले. दरम्यान हा सामना प्रत्येकी 6-6 ओव्हर्सचा खेळवण्यात आला. मात्र या सामन्यात भारतीय चाहत्यांची थोडीशी निराशा झाली. कारण पाकिस्तानच्या संघाने भारतीय संघाचा पराभव केला आहे. भारताने दिलेले टार्गेट पाकिस्तान सहजपणे प्राप्त केल्याचे पाहायला मिळाले.

आज हाँगकाँग सिक्सेस टूर्नामेंटमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात महत्वाचा सामना पार पडला. हा सामना प्रत्येकी 6-6 ओव्हरचे खेळवण्यात आला. या रोमांचक सामन्यात भारताने पाकिस्तानला विजयासाठी 89 रन्सचे टार्गेट दिले होते. ते टार्गेट पाकिस्तानने केवळ 23 बॉलमध्येच पूर्ण केले. हॉन्ग कॉन्ग सिक्सेस स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा ४ विकेट्सने पराभव केला आहे. डिफेंडिंग चॅम्पियन आणि अब्बास आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने भारताचा पराभव केला आहे. 

या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने शशांक सिंगच्या तुफानी खेळीच्या जोरावर 1 विकेट गमावून 6 ओव्हर्समध्ये तब्बल 88 रन्स ठोकल्या. पाकिस्तानला भारताने 89 रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र पाकिस्तानने केवळ 23 बॉलमध्ये 4 विकेट्स राखून हे टार्गेट सहजरीत्या पूर्ण केले.

Pakistan 🇵🇰 beat India 🇮🇳 badly in the Hong Kong Sixes because of Nitish & Krunal 🤯 – Nitish Rana retired hurt after playing a terrible knock of 19 off 14 balls. – Krunal Pandya leaked 31 runs in his opening over. – Pakistan successfully chased down 89 runs in just 3.5 overs. – Only Shashank Singh gave an big impact: 40 off 11 balls. — Mukku (@Cric_Mukku) October 30, 2026

पाकड्यांना रडवायला Team India सज्ज; 10 दिवसांत दोन वेळा भिडणार; पहा संपूर्ण वेळापत्रक

भारताचे गोलंदाज काहीसे अपयशी ठरल्याचे दिसून आले. भारताचा फिरकीपटू कृणात पंड्याला एकाच ओव्हरमध्ये तब्बल पाकिस्तानच्या फलंदाजाने 5 सिक्सर मारले. त्यामुळे हा सामना पूर्णपणे पाकिस्तानच्या बाजूने झुकल्याचे दिसून आले. याआधीच्या सामन्यात पाकिस्तानला यूएईविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

  • भारतीय संघ:

    नितीश राणा, राहुल त्रिपाठी, राहुल तेवतिया (यष्टिरक्षक), क्रुणाल पांड्या (कर्णधार), शशांक सिंह, कुलवंत खेजरोलिया, टी. नटराजन. (टीप: हॉन्ग कॉन्ग सिक्स प्रकारात एका संघात ६ खेळाडू खेळतात).

  • पाकिस्तान संघ:

    ख्वाजा नफे (यष्टिरक्षक), अब्दुल समद, अब्बास आफ्रिदी (कर्णधार), इरफान खान, अहमद दानियाल, मुहम्मद शहजाद.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 6 ओव्हर्समध्ये 88 रन्स केल्या. हे टार्गेट पाकिस्तानने सहज पूर्ण केले.  भारताकडून  शशांक सिंगने आक्रमक खेळी केली. भारताने दिलेले ८९ रन्सचे टार्गेट पाकिस्तानच्या फलंदाजांनी अवघ्या २३ बॉलमध्ये पूर्ण केले. पाकिस्तानने भारताचा 4 विकेट्सने पराभव केला आहे.

IND vs PAK Final: अभिषेक-तिलकचा हल्लाबोल अन् शेवटच्या १२ चेंडूंचा थरार! पाकिस्तानला पुन्हा लोळवत टीम इंडियाने जिंकलं गोल्ड मेडल

हॉन्ग कॉन्ग सिक्सेस ही स्पर्धा प्रामुख्याने हॉन्ग कॉन्गमधील क्रिकेटपटूंना आणि स्थानिक चाहत्यांना जगातील टॉप इंटरनॅशनल खेळाडूंना थेट मैदानावर खेळताना पाहण्याची संधी मिळावी, या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. १९९० च्या दशकात आयसीसी मध्ये एसोसिएट मेंबर असल्यामुळे हॉन्ग कॉन्ग क्रिकेट संघाकडे मोठ्या आणि नामांकित देशांच्या खेळाडूंविरुद्ध खेळण्यासाठी फारसे व्यासपीठ किंवा संधी उपलब्ध नव्हती. त्यामुळे या स्थानिक चाहत्यांच्या आणि खेळाडूंच्या आवडीखातर या अनोख्या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हाँगकाँग सिक्सेसमध्ये आज कोणाचा सामना होता?

    Ans: आज हाँगकाँग सिक्सेसमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला.

  • Que: महामुकाबल्यात कोणाचा विजय झाला?

    Ans: पाकिस्तानच्या संघाने भारताचा 4 विकेट्स राखून पराभव केला.

Web Title: Pakistan cricket team beat india by 4 wikcets hong kong sixes tournament tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • cricket news
  • IND VS PAK
  • India vs Pakistan
  • Sports News

संबंधित बातम्या

Cricket: पिंपरी चिंचवड करंडकात लक्ष्य ॲकॅडमीचा धमाका! कुंदन कुमारच्या अष्टपैलू कामगिरीने थेट…
1

Cricket: पिंपरी चिंचवड करंडकात लक्ष्य ॲकॅडमीचा धमाका! कुंदन कुमारच्या अष्टपैलू कामगिरीने थेट…

पुणेकरांनो धावण्यासाठी व्हा तयार! ‘या’ दिवशी रंगणार भव्य Marathon स्पर्धा, तब्बल 10 हजार…
2

पुणेकरांनो धावण्यासाठी व्हा तयार! ‘या’ दिवशी रंगणार भव्य Marathon स्पर्धा, तब्बल 10 हजार…

Chiplun: जगात भारी आमचे रत्नागिरी! १३ जणांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; हैदराबादमध्ये होणार सामने
3

Chiplun: जगात भारी आमचे रत्नागिरी! १३ जणांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; हैदराबादमध्ये होणार सामने

पाकड्यांना रडवायला Team India सज्ज; 10 दिवसांत दोन वेळा भिडणार; पहा संपूर्ण वेळापत्रक
4

पाकड्यांना रडवायला Team India सज्ज; 10 दिवसांत दोन वेळा भिडणार; पहा संपूर्ण वेळापत्रक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.