
कतारमध्ये दाखल झाला भारतीय संघ
आज बीसीसीआयने सोशल मिडियावर पोस्ट करत भारतीय संघ संघ कतारमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली आहे. या स्पर्धेत इंडिया ए संघाचे नेतृत्व स्फोटक डावखुरा फलंदाज तिलक वर्मा करताना दिसणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघात अनेक प्रतिभावान, युवा खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
IND Vs PAK U-19 Final: पाकड्यांचा माज उतरवला; अटीतटीच्या सामन्यात Team India ने जिंकली ट्रॉफी
आगामी ‘रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने स्फोटक आणि युवा खेळाडूंचा समावेश संघात केला आहे. वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा हे दोन स्फोटक फलंदाज ओपन करण्याची शक्यता आहे. फिनिशर रिंकू सिंह, यष्टीरक्षक-फलंदाज प्रभसिमरन सिंह आणि अष्टपैलू सूर्यांश शेडगे मिडल ऑर्डरमध्ये भारतीय संघाची बाजू सांभाळून धरणार आहेत.
दोहा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६’ भारतीय संघाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणा दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मैदानावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. दुसरीकडे, अनुभवी फलंदाज रजत पाटीदार दुखापतग्रस्त झाल्याने त्याला या संपूर्ण स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.
भारतीय संघ: तिलक वर्मा (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, अभिषेक पोरेल, वैभव सूर्यवंशी, रिंकू सिंह, आयुष बडोनी, नेहाल वढेरा, अभिषेक शर्मा, रमणदीप सिंह, निशांत सिंधू, सूर्यांश शेडगे, रसिक सलाम, वैभव अरोरा, सुयश शर्मा, आर. साई किशोर
Ans: रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ स्पर्धेला आगामी १९ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.
Ans: येत्या 22 नोव्हेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे.