
आज पार पडली भारत-पाकिस्तान फायनल मॅच
भारताची फलंदाजी
पाकिस्तानच्या संघाने भारताला विजयासाठी 338 रन्सचे टार्गेट दिले होते. तया टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाकडून प्रथम कर्णधार लक्ष्य राजेश रायचंदानी आणि आर्यवीर सेहवाग यांनी सुरुवात केली. लक्ष्य राजेश रायचंदानीने 80 रन्सची तर आर्यवीरने 58 रन्सची शानदार खेळी करत भारतीय संघाला एक चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर व्ही. के. विनीतने 24 रन्स तर अर्जुन राजपूतने 18 रन्सची खेळी केली.
𝗖.𝗛.𝗔.𝗠.𝗣.𝗜.𝗢.𝗡.𝗦 🏆 An absolutely incredible run chase in the Final gives India U19 the #MensU19AsiaCup 2026 title 🇮🇳 👏 Scorecard ▶️ https://t.co/srKsrr1jna https://t.co/BYh3iNO18o — BCCI (@BCCI) November 14, 2026
भारतीय संघ काहीसा अडचणीत सापडल्याचे वाटत होते. कारण यशवर्धन देखील केवळ 9 रन्स करून आउट झाला. मनल चौहानने 47 रन्स करत भारताचा डाव सांभाळला. शेवटची एक विकेट शिल्लक असताना भारताला 10 बॉलमध्ये 25 रन्सची आवश्यकता होती. मात्र मोहित उल्वाने 49 रन्सची महत्वाची खेळी केली. त्याच्या या खेळीने शेवटच्या क्षणी भारताने सामना जिंकत ट्रॉफी उंचावली आहे. अंडर-19 आशिया कपचे विजेतेपद भारताने पटकावले आहे.
भारतीय संघ: लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), यशवर्धन सिंग चौहान, आर्यावीर सेहवाग, व्ही. के. विनीत, कुशाग्र ओझा, मनाल चौहान, अन्वय द्रविड , रजत बघेल , व्ही. यशवीर , आर्यन सवसाणी, काव्या पटेल, शाविन विनोद, ईशान सूद.
Ans: भारताने पाकिस्तानचा पराभव करत अंडर-19 आशिया कपचे विजेतेपद पटकावले.
Ans: भारताने शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवर फोर मारून रोमांचक विजय मिळवला.