'It affected our relationship, I made a mistake..', former cricketer grieves over 'that' controversial statement about King Kohli
Robin Uthappa and Virat Kohli dispute! भारतीय क्रिकेटमधील विराट कोहली हे मोठे नाव आहे. विराट कोहलीने भारतीय संघासाठी क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात आपल्या बॅटने खोऱ्याने धावा काढल्या आहेत. विराट कोहलीने टी २० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. विराट कोहली आणि भारतीय संघातील इतर खेळाडूंबाबत काही दुराव्याचे क्षण देखील आले आहेत. यामध्ये माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाचे नाव आहे. विराट कोहलीबाबत रॉबिन उथप्पाने काही वादग्रस्त विधान केले होते. याबाबत आता माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने विराट कोहलीबाबत केलेल्या विधानामुळे विराट कोहली आणि त्याच्या नात्यात कडवटपणा अलया होता. असे मत रॉबिन उथप्पाने मांडले आहे. आपण जे काही बोलून गेलो आहोत त्यधि विराट सोबत बोलायला हवे होते. असे देखील रॉबिन उथप्पाने सांगितलं आहे. पण, याबाबत रॉबिन उथप्पाने विराट कोहलीसोबत काही एक चर्चा केलेली नाही. रॉबिन उथप्पाने 2019 वर्ल्डकपवेळी विधान केले होते. हे विधान थेट तत्कालीन एकदिवसीय कर्णधार विराट कोहलीसोबत निगडीत होते. रॉबिन उथप्पाने आता या विधानाबाबत एका मुळखतीत भाष्य केले आहे.
रॉबिन उथप्पाने मुलाखती दरम्यान सांगितले की, “विराट कोहलीला जर कोणी आवडत नसायचा तर टॉम त्याच्या नजरेत चांगला देखील राहत नसे. नाही तर तो त्याच्या नजरेत चांगलाही नसायचा. याचे अंबती रायुडू हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आवडणे आणि नापसंत करणे यामध्ये काही एक चुकीचे नाही. पण अंबाती रायुडूसारखे खेळाडू ज्यांना तुम्ही विश्वचषकाच्या जवळ घेऊन येता आणि नंतर काढून टाकता. हे काही योग्य नाही. रायुडूकडे विश्वचषकासाठी कपडे देखील होते, तसेच त्याच्याकडे त्याची किट बॅग होती. अशा परिस्थितीत तो मनात विचार करत असेल की आपण विश्वचषक खेळणार आहे. पण अचानक त्याला संघातून वगळण्यात आलं.”
रॉबिन उथप्पाने केलेल्या या विधानाचा त्याच्यावर परिणाम झाला आहे. त्याने याबाबत आता आपलं म्हणणं स्पष्ट केलं आहे. त्या विधानामुळे त्याच्या आणि विराटसोबतच्या नात्यावर वाईट परिणाम झाला आहे. २०१९ च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेदरम्यानं माझा मित्र अंबाती रायुडूसोबत जे काही घडत होते, ते मी पाहिले आणि समजले होते, पण विराटसोबत याबबत काही एक बोललो नव्हतो. मला त्याबाबत विराटशी बोलायला हवे होते. हे त्याच्या नेतृत्वाचा नसून तर त्याच्या कर्णधारपदाचं देखील एक प्रकरण आहे. प्रत्येकाच्या कर्णधारपदाचा वेगवेगळा अंदाज असतो. त्याची विचार करण्याची एक वेगळी पद्धत असते. असे माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा म्हणाला.
हेही वाचा : UAE vs AFG : UAE च्या कर्णधाराने T20 मध्ये केला ‘हा’ भीम पराक्रम! मोडला ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा विश्वविक्रम