पंजाबमधील बिकट पूर स्थितीवर शुभमन गिलची प्रतिक्रिया(फोटो-सोशल मीडिया)
Shubman Gill on Punjab floods : पंजाब राज्यात सध्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे पंजाबमध्ये पुर संकट निर्मम झाले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक लोक प्रभावित झाले आहेत. अडीच लाखांहून अधिक लोकांना पुराचा चांगलाच फटका बसला आहे. या काळात काही लोकांचा जीव देखील गमवावा लागला आहे. यानंतर भारताचा माजी अष्टपैलू स्टार खेळाडू युवराज सिंगने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांतर आता टीम इंडियाचा कसोटी कर्णधार शुभमन गिलने पंजाबच्या बिकट परिस्थितीवर आपल्या भावनांना वाट मोकळी केली आहे. तो म्हटलं आहे की, पंजाबला पुराचा फटका बसलेला पाहून माझे मन तुटले आहे.
पंजाब पुर दुर्घटनेवर शुभमन गिलने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शुभमन गिलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिले आहे की, “आपल्या पंजाबला पुराने उद्ध्वस्त झालेले पाहून मन तुटत आहे. पंजाब प्रत्येक संकटापेक्षा बलवान आहे. आपण यातून सावरू आणि पुन्हा उभे राहू. माझ्या प्रार्थना सर्व बाधित कुटुंबांसोबत आहेत. मी माझ्या लोकांसोबत खंबीरपणे उभा आहे.”
हेही वाचा : UAE vs AFG : UAE च्या कर्णधाराने T20 मध्ये केला ‘हा’ भीम पराक्रम! मोडला ‘हिटमॅन’ रोहित शर्माचा विश्वविक्रम
पंजाबमध्ये पुराचा चांगलाचा फटका बसला आहे. या पुराचा सर्वाधिक परिणाम अमृतसरमध्ये दिसून आला आहे, जिथे ३५ हजारांहून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. त्याच वेळी, फिरोजपूरमध्ये २४ हजारांहून अधिक लोक पुराच्या तावडीत सापडले आहेत. फाजिल्का, होशियारपूर, पठाणकोट, गुरुदासपूर, कपूरथला, जालंधर, बर्नाला आणि मोगा येथेही पुराचा परिणाम दिसून आला आहे.
Heartbroken to see my Punjab devastated by floods. Punjab will always be stronger than any adversity, and we’ll rise up from this. My prayers are with all affected families. Standing strong with my people 🙏
— Shubman Gill (@ShubmanGill) September 2, 2025
राज्य सरकारच्या माहितीनुसार पठाणकोटमध्ये ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे, तर गुरुदासपूर, पटियाला, बठिंडा आणि संगरूरमध्ये प्रत्येकी एकाचा बळी गेला आहे. पठाणकोटमध्ये तीन जण बेपत्ता असून आतापर्यंत सुमारे १५ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
मुसळधार पाऊस आणि पुरामुळे पंजाबमधील जनजीवन कमालीचे प्रभावित होऊन ते विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी परिस्थितीवर चर्चा केली आहे. अधिकृत सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री भगवंत मान यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
हेही वाचा : US Open 2025 : जेसिका, जोकोविचसह अल्काराज यांची क्वार्टर फायनलमध्ये एंट्री; दुसऱ्या फेरीत भारताची ‘माया’
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी याबबत माहिती देताना म्हटले आहे की, राज्य सरकारकडून पूरग्रस्त भागातून लोकांना बाहेर काढण्याचे आणि त्यांना तात्काळ मदत देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. बाधित लोकांच्या झालेल्या नुकसानाची प्रत्येक पैशाची भरपाई राज्य सरकार करेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.