मोहम्मद वसीम(फोटो-सोशल मीडिया)
UAE vs AFG : युएई क्रिकेट सध्या एक लहान संघ म्हणून ओळखला जातो. त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हवा तसा लौकिक नाही. परंतु, याच लहान संघाच्या कर्णधाराने भारताचा दिग्गज एकदिवसीय कर्णधार रोहित शर्माचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. तत्पूर्वी आपण अफगाणिस्तान आणि यूएई यांच्यातील सामन्याबाबत माहिती घेऊया. तिरंगी मालिकेत दोन्ही संघांमध्ये प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या अफगाणिस्तान संघाने १८८ धावा उभ्या केल्या होत्या. प्रतिउत्तरात युएई संघ १५० धावा करू शकला नाही आणि परिणामी अफगाणिस्तानने युएईचा ३८ धावांनी पराभव केला आहे.
तिरंगी मालिकेत झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी चांगला कहलचे प्रदर्शन दाखवले रशीद खानच्या नेतृत्वाखालील अफगाण संघाने विजय नोंदवून आपला दबदबा दाखवून दिला. या दरम्यान, युएईचा कर्णधार मोहम्मद वासिमने भारताचा स्फोटक फलंदाज रोहित शर्माचा विक्रम आंतरराष्ट्रीय टी२० मधील विश्वविक्रम मोडला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात वसीमने स्फोटक फलंदाजी करत त्याने मोठी कामगरी केली. या दरम्यान तो संघाला मात्र विजय मिळवून देऊ शकला नाही.
तिरंगी मालिकेत खेळवण्यात आलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात यूएईचा कर्णधार मोहम्मद वसीमने अफगाण गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. या सामन्यात त्याने ३७ चेंडूंचा सामना करत ६७ धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याच्या खेळीत त्याने एकूण ४ चौकार आणि ६ षटकारांची आतिषबाजी केली. मोहम्मदने सामन्यात ६ षटकार मारून रोहित शर्माचा टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विक्रम मोडीत काढला आहे.
यूएईचा कर्णधार आता टी२० मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. यादरम्यान, त्याने टीम इंडियाचा एकदिवसीय कर्णधार रोहित शर्माला मागे टाकले आहे. आता मोहम्मद वसीमच्या नावे टी२० मध्ये एकूण ११० षटकार लगावले आहेत. यापूर्वी हा विक्रम टीम इंडियाचा एकदिवसीय कर्णधार रोहित शर्माच्या नावावर जमा होता. रोहित शर्माने टी२० मध्ये एकूण १०५ षटकार खेचले आहेत. वसीमने अफगाणिस्तानविरुद्ध २ षटकार मारून रोहितचा विक्रम मोडीत काढला आहे.
हेही वाचा : UAE vs AFG : रशीद खानने टी-२० मध्ये बनवले खास सिंहासन! सर्वांना पछाडून बनला नंबर-१ गोलंदाज
सामन्याबद्दल सांगायचे झाले तर अफगाणिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ४ गडी गमावून १८८ धावा उभ्या केल्या. अफगाणिस्तानने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या यूएई संघ २० षटकांत ८ गडी गमावून १५० धावाच करू शकला.