फोटो सौजन्य - R A T N I S H सोशल मीडिया
Rohit Sharma’s press conference : भारताच्या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात सलग आठव्या महिन्यात दुसरी चॅम्पियन ट्रॉफी नावावर केली आहे. २०२४ मध्ये झालेल्या T२० विश्वचषक भारताच्या संघाने जिंकल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी T२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि सर्वानाच धक्का बसला होता. आता भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणणार असल्याच्या सर्व अटकळींना पूर्णविराम दिला. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्माने निवृत्तीच्या बातम्या फेटाळून लावल्या आणि म्हटले की तो लवकरच एकदिवसीय क्रिकेटला अलविदा म्हणणार नाही.
फायनलच्या सामन्यांमध्ये त्याने कमालीची भारतीय संघाला सुरुवात करून दिली आणि टीम इंडियाला मजबूत स्थितीमध्ये उभे केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून रोहितच्या कर्णधारपदाबद्दल आणि संघातील त्याच्या स्थानाबद्दल अटकळ बांधली जात होती, परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने केलेली ७६ धावांची खेळी त्याच्या कारकिर्दीसाठी जीवदान ठरली. अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर चार विकेट्सनी विजय मिळवल्यानंतर त्याने पत्रकार परिषदेत सांगितले की, “मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत नाहीये. कृपया अफवा पसरवू नका.”
त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल विचारले असता तो म्हणाला, “भविष्यातील कोणत्याही योजना नाहीत. ”यावरून असे म्हणता येईल की रोहित शर्मा देशासाठी कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत राहू इच्छितो.” २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अशा परिस्थितीत, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर तो एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्त होईल असे म्हटले जात होते तथापि, असे नाही.
AN IMPORTANT UPDATE FROM ROHIT! 😁#ChampionsTrophyOnJioStar #RohitSharma #ChampionsTrophy2025 pic.twitter.com/6cMNsCFPAi
— Star Sports (@StarSportsIndia) March 9, 2025
बरं, जर आपण विचार केला तर, रोहित शर्मा २०२७ पर्यंत एकदिवसीय विश्वचषक खेळू इच्छितो, कारण तो अनेकदा म्हणतो की आयसीसी ट्रॉफी म्हणजे त्याच्यासाठी एकदिवसीय विश्वचषक आहे, जो तो जवळ आल्यानंतर दोनदा चुकला आहे. २०१९ मध्ये त्याने पाच शतके झळकावली, पण संघाला तिथे उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला आणि २०२३ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली संघाला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. अशा परिस्थितीत, त्याला पुन्हा एकदा ते विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करावा असे वाटेल.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने सलग चौथ्या वेळा टीम इंडियाला फायनलमध्ये नेले आहे. रोहित शर्मा हा जगातला एकमेव कॅप्टन आहे ज्याने संघासाठी ही मोठी कामगिरी केली आहे. भारताच्या या दमदार कामगिरीने त्यांचे जगभरामध्ये कौतुक केले जात आहे. भारताच्या संघाने T२० क्रिकेटनंतर आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही दबदबा निर्माण केला आहे.